चंद्रपूर - जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत हरविलेले नागरिकांचे एकूण 578 शोध घेण्यात आला होता त्यापैकी तब्बल 200 मोबाईल शोधण्यास सायबर पोलिसांना यश मिळाले आहे.
जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशन हद्दीत 578 मोबाईल हरविल्याची तक्रार प्राप्त झाली होती, ह्या सर्व मोबाईल चा तपास Cyber पोलिसांनी केला असता यामध्ये 31 लाख 66 हजार रुपये किमतीचे 200 मोबाईल पोलिसांनी जप्त केले. Mobile lost
8 मार्चला सर्व 200 मोबाईल संबंधित नागरिकांना परत करण्यात आले.
सदर मोलाची कामगिरी Cyber Cell चे भास्कर चिंचवळकर यांनी केली.
उर्वरित मोबाईलचा शोध सुरू असून मोबाईल हस्तगत झाल्यास संबंधित नागरिकांना त्याबाबत सूचना देण्याचे काम सुरू आहे. Chandrapur police