News34
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
पुर्वी "चूल आणि मुल" पर्यंत मर्यादित असलेली ती अबला नारी,सबला बनून आजच्या युगात सर्वच क्षेत्रात अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने काम करीत आहे.
Politics,समाजकारण,कला,क्रीडा, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान,शिक्षण,उद्योग अशा सर्वच क्षेत्रात महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवला आहे.असे कोणतेही क्षेत्र नाही ज्यामध्ये आजची महिला पुरूषांच्या मागे आहे.पुर्वी जी ओळख महिलाची होती ती आता पुसली गेली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही."जिच्या हाती पाळण्याची दोरी,तीच जगाला उद्धारी" या म्हणीप्रमाणे महिलांच्या सन्मानात दरवर्षी जगभर 8 मार्च हा दिवस "world woman day" म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा गौरव केला जातो.याच पार्श्वभूमीवर इतर ठिकाणांसह हरदोना खुर्द येथे अंबुजा सिमेंट फाऊंडेशन उप्परवाही व एकता फेडरेशनच्या वतीने महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने पाक कला,नृत्य व विविध स्पर्धा, health तपासणी शिबीर आयोजित करण्यात आली. कोरोना महामारीत स्वतःच्या जीवाची परवा न करता गावात घरोघरी भेट देऊन सतत आरोग्य सेवा देणाऱ्या हरदोना येथील आशा वर्कर "केसर कातकर" या महिलेचा फेडरेशनच्या महिलांनी शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.स्पर्धकांना गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमात कारवा, मंगी, उप्परवाही, थुटरा, पाचगाव,पिपर्डा,कुकुडसाथ इतर गावातील एकता महिला फेडरेशनच्या महिलांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती.यावेळी महिलांचा उत्साह वाखान्या जोगा होता.संचालन चंदा सैय्यद,प्रास्तावीक सुनंदा शिंदे तर आभार सिमा दुरटकर यांनी व्यक्त केले.