चंद्रपूर - 16 मार्चला शहरातील पठाणपुरा गेट बाहेरील चोराळा येथील क्षितिज लेआऊट मध्ये 22 वर्षीय युवतीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली.
अभिषेक देशभ्रतार नामक युवकाने मृतक युवतीला ब्रेकअप होत असल्याने शेवटची भेट घ्यायची असे म्हणत बोलाविले, मात्र काही वेळात मुलीच्या मृत्यूची माहिती पुढे आली. News34 follow google news
याप्रकरणात माजी खासदार हंसराज अहिर यांनी पोलीस या प्रकरणाची चौकशी निष्पक्ष करत नसल्याचा आरोप लावला होता, मात्र 4 दिवसांनी त्या युवतीच्या मृत्यूबाबत पडोली पोलिसांनी खुलासा करीत त्या युवतीचा मृत्यू हा अपघाताने झाला असल्याचे सांगितले. Suspicious death
मात्र मृतक युवतीच्या कुटुंबाने पोलिसांवर गंभीर आरोप लावले आहे, घटनेचे 24 तास उलटल्यावर शवविच्छेदन व पंचनामा करण्यात आला, आधी पोलीस तक्रारीत मृत्यू ट्रक च्या धडकेत झाला असल्याची नोंद, परिवाराने आक्षेप घेतल्यावर ट्रक चा उल्लेख हा चुकीने झाला असल्याची पोलिसांनी कबुली दिली. Chandrapur police
24 तास उलटल्यावर पोलिसांची चौकी संदेहास्पद असल्याचा संशय व्यक्त करीत या चुकीने पुरावे नष्ट झाले असल्याचा आरोप कुटुंबाने पत्रकार परिषदेत केला. No accident its murder
युवतीचा मृत्यू हा अपघाती नसून घातपात आहे, कारण तिच्या शरीरावर कुठेही जखमा नाही, फक्त गुप्तांगावर जखमा आहे, पोलिसांनी निष्पक्ष चौकशी केल्यास सत्य समोर येणार असल्याचे म्हटले आहे.