News34
चंद्रपूर - आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आयोजित आमदार चषक विदर्भस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा काल हजारो नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली या स्पर्धेत बुलढाणा जिल्हाचा भारत बोडाडे आमदार श्री Champion of champion ठरला तर नागपूरातील योगेश शेंडे बेस्ट पोझर आणि चंद्रपूरातील किरण ठाकरे बेस्ट इंम्प्रुमेंट पूरस्काराचा मानकरी ठरला आहे. या कार्यक्रमाला चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची अध्यक्ष म्हणून तर जग प्रसिध्द बॉडी बिल्डर सुहास खामकर यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती.
चंद्रपूरकरांना उत्सुकता असलेली यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आयोजित विदर्भस्तरीय body building competition बॉडी बिल्डिंग स्पर्धा काल शनिवारी महानगर पालिकेच्या पटांगणावर उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत विदर्भातील नागपूर, यवतमाळ, अमरावती, बुलाढाणा, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली या सह ईतर जिल्ह्यातील नामांकीत एकुन 98 बॉडी बिल्डरांनी सहभाग घेतला होता. वजन गट 0 ते 55, 55 ते 60, 60 ते 65, 65 ते 70, 70 ते 75 आणि 75 प्लस या सहा गटात ही स्पर्धा घेण्यात आली. यावेळी या सहाही गटातील पाच विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, शिल्ड आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. यात 0 ते 55 गटात चंद्रपूरचे किरण ठाकरे प्रथम आले तर 55 ते 60 गटात यवतमाळचे राजेश क्षिरसागर, 60 ते 65 गटात अकोल्याचे शेख सलीम, 65 ते 70 गटात चंद्रपूरचे राज अटकापूरवार, 70 ते 75 गटात नागपूरचे योगेश शेंडे आणि 75 प्लस गटात बुलढाण्याचे भारत बोडाडे हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.
त्यानंतर सर्वांचे लक्ष लागलेल्या आमदार श्री 2022 साठी स्पर्धा घेण्यात आली यातही बुलढाणा जिल्ह्यातील भारत बोडाडे यांनी बाकी बॉडी बिल्डरांना मात देत आमदार श्री 2022 ची चॅम्पियन ऑफ द चॅॅम्पियन ट्रॉफी पटकावली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार आणि जगप्रसिध्द बॉडी बिल्डर Suhas Khamkar यांच्या हस्ते भारत बोडाडे यांना सदर ट्रॉफी, रोख रक्कम, आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. बॉडी बिल्डिंग हा खेळ आता लोकप्रिय होत चालला आहे. याचे शारिरिक दृष्ट्याही अनेक फायदे आहे. चंद्रपूर जिल्ह्यांनेही आजवर अनेक बॉडी बिल्डर तयार केले आहे. भविष्यातही चंद्रपूरात उत्कृष्ट बॉडी बिल्डर तयार व्हावेत अशी आशा यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली. तसेच चंद्रपूरातील बॉडी बिल्डरांना मोठे व्यासपीठ मिळण्यासाठी असे आयोजन आम्ही करत राहु असे प्रतिपादन यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. या स्पर्धेला दिलीप सेनगारप, अरुन देशपांडे, सुधिर अभ्यंकर, नरेंद्र भुते, चंद्रशेखर वनकर, दिलीप करकाडे, संजय देशमूख आणि राजेश त्रिवेदी यांची परिक्षक म्हणून तर साजित शेख, भुषन देशमूख, पन्नालाल बहूरिया आणि विक्रम अरोरा यांची स्टेज मार्शल म्हणून उपस्थिती होती. News34 follow in Google news
या कार्यक्रमाला चंद्रपूरकरांची हजारोेच्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.