News34
मूल (गुरू गुरनुले)
जनसुविधा योजने अंतर्गत बांधकामासाठी प्राप्त झालेल्या शासकीय निधीची संगनमताने अफरातफर केल्याच्या आरोपाखाली नांदगांव येथील तत्कालीन सरपंच मंगेश मगनुरवार आणि ग्रामसेवक उत्तम बावनथडे सध्या कारागृहात न्यायालयीन कोठडीची हवा खात आहेत.
विद्यमान सरपंच हिमानी वाकुडकर यांच्या तक्रारीनुषंगाने झालेल्या चौकशीअंती तत्कालीन संवर्ग विकास अधिकारी यांच्या तक्रारीवरून माजी सरपंच मगनुरवार आणि ग्रामसेवक बावनथडे यांचे विरूध्द गुन्हा दाखल झाला. दाखल झालेल्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी मगनुरवार आणि बावनथडे मागील चार महीण्यांपासुन अटकपुर्व जामीनासाठी प्रयत्न करीत होते. परंतु न्यायालयाने अटकपुर्व जामीन न दिल्याने शेवटी मगनुरवार आणि बावनथडे ह्यांना मूल पोलीसांसमोर शरण येणे भाग पडले. (Types of financial fraud)
पंचायत समिती मूल अंतर्गत ग्राम पंचायत नांदगांव येथे सन २०२०-२१ या वित्त वर्षात शासनाचे जनसुविधा योजने अंतर्गत नवीन ग्राम पंचायत भवन व स्मशानभुमी बांधकामा करीता ३० लाख रूपये प्राप्त झाले. लाखो रूपये खर्चाच्या या बांधकामा करीता आँनलाईन निवीदा प्रक्रिया राबविण्यांत आली. त्यामूळे अनेक इच्छुक कंत्राटदारांनी आँनलाईन निवीदा सादर केल्या. त्यानुसार सदर दोन्ही कामांसाठी योग्य कंत्राटदाराची निवड करून त्यांना काम करण्याचे आदेश देणे आवश्यक होते. परंतू तत्कालीन सरपंच मंगेश मगनुरवार व ग्रामसेवक उत्तम बावनथडे यांनी सदर निधी मधून कोणतेही बांधकाम न करता ग्राम पंचायत सदस्यांशी संधान साधून प्राप्त झालेल्या शासकिय निधीमधून २२ लाख ४ हजार ८४६ रूपये ग्राम पंचायत सदस्यांचा कार्यकाल संपुष्टात येण्याच्या तोंडावर २०२० मधील माहे मे, जुन, जुलै आणि आँगस्ट या चार महिण्याच्या काळात तब्बल १९ वेळा धनादेशावर सेल्फ लिहून काढल्याचा धक्कादायक प्रकार सरपंच हिमानी वाकुडकर यांच्या लक्षात आला. सदर प्रकार लक्षात येताच सरपंच या नात्याने ग्रामसेवक उत्तम बावनथडे यांना जनसुविधा योजनेबाबत माहिती मागवली तेव्हा तब्बल पाच महिणे पर्यंत माहिती देण्यास त्यांनी टाळले.
दरम्यान ग्रामसेवक बावनथडे माहिती देत नसल्याची तक्रार पंचायत समिती मध्यें दाखल केल्यानंतर तब्बल आठवडयाभराने बावनथडे यांनी जनसुविधा योजनेची माहिती पुरविली. (Money laundering)
प्राप्त झालेल्या जनसुविधा योजनेच्या दस्तऐवजांची पडताळणी केली तेव्हा सदर कामात तत्कालीन सरपंच मंगेश मगनुरवार यांनी ग्राम पंचायत सदस्य आणि ग्रामसेवक बावनथडे यांचेशी संधान सांधून शासकिय निधीची वाट लावल्याचे दिसून आले. त्यामूळे जनतेच्या कल्याणासाठी प्राप्त झालेल्या शासकिय निधीचा अपहार झाल्याचे सकृत दर्शनी दिसून आल्याने सदर प्रकरणाची चौकशी करून संबंधीता विरूध्द कारवाई करावी व अफरातफर केलेल्या रक्कमेची वसुली करावी. अशी मागणी सरपंच हिमानी वाकुडकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडे केली. तक्रारीत सरपंच हिमानी वाकुडकर यांनी मंजुर निधी नुसार काम न करणे, ई टेंडरींग नुसार कंत्राटदाराला काम करण्याचे आदेश न देणे, काम न करता पंचायत समिती प्रशासनाला चुकीची माहिती पुरविणे, शासनाच्या निकषांनुसार बांधकाम न करता मर्जीने बांधकाम करून निधीची परस्पर विल्हेवाट लावणे, योजनेची खोटी माहिती बॅंकेसह पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाला देणे, पंचायत समितीच्या पंधरवाडी सभेत ग्राम सेवकाकडून खोटी व दिशाभुल देणारी माहिती सांगणे, आदि प्रकार घडल्याचे नमुद केले. तक्रारीच्या प्रती ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि जिल्हाधिकारी यांनाही दिल्या. सरपंचा वाकुडकर यांच्या तक्रारीनुषंगाने तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी मूल पं.स.चे संवर्ग विकास अधिकारी यांच्या चौकशी अहवाल नुसार जनसुविधा योजनेतील गैरव्यवहार, Swachh Bharat Mission अंतर्गत रेकार्ड गहाळ करणे, निधीचा दुरूपयोग आणि अफरातफर करण्यात ग्रामसेवक उत्तम बावनथडे यांना दोषी ठरवुन निलंबीत केले. News34 follow google news
सदर गैरप्रकार हा ग्रामसेवक आणि सरपंच यांनी संगनमताने केला असल्याने सरपंच मगनुरवार आणि ग्रामसचिव बावनथडे यांचे विरूध्द कायदेशीर कारवाई करावी. असे संवर्ग विकास अधिकारी यांना निर्देश दिल्यानंतर पंचायत प्रशासनाच्या वतीने सरपंच मंगेश मगनुरवार आणि ग्रामसचिव उत्तम बावनथडे यांचे विरूध्द पोलीस स्टेशन मूल येथे तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार चौकशीअंती सरपंच आणि ग्रामसचिव यांचे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीसात गुन्ह्याची नोंद होताच मगनुरवार आणि बावनथडे अज्ञातवासात गेले. (Pre-arrest bail)
दोघांनीही अटकपुर्व जामीनासाठी उच्च न्यायालायात धाव घेतली. परंतु न्यायालयाने दोघांनाही अटकपुर्व जामीन नाकारल्याने शेवटी मगनुरवार आणि बावनथडे यांना पोलीसांसमोर शरण यावे लागले. पोलीसांनी दोघांनाही अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांचीही न्यायालायीन कोठडीत रवानगी केली. (Swachh Bharat Mission gramin)
