चंद्रपूर - भाजपचे कट्टर कार्यकर्ते, अनेक वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला लढविणारे नगरसेवक वसंता देशमुख अखेर कांग्रेस पक्षात 5 मार्चला जाहीर प्रवेश करणार आहे. Bjp corporator chandrapur
चंद्रपूर मनपाच्या निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षप्रवेश भाजपला चांगलीच चपराक असणार आहे.
जेष्ठ भाजप कार्यकर्ते तथा भिवापूर प्रभागातील भाजपचा किल्ला शाबूत ठेवणारे नगरसेवक वसंता देशमुख पक्षांतर्गत वादाला कंटाळत कांग्रेसचा "हात" पकडणार आहे. Join Congress
भाजप पक्षात अनेक वर्षे कार्यकर्त्यासारखं काम केलं, मात्र पद द्यायच्या वेळी नवख्याना संधी दिल्याने वसंता देशमुख पक्षावर नाराज होते. Cmc chandrapur election
पक्षातील जेष्ठ नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला.
शनिवारी 5 मार्चला पालकमंत्री विजय वडेट्टीवार व खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कांग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात वसंता देशमुख आपल्या कार्यकर्त्यांसह कांग्रेस मध्ये सामील होणार आहे. Congress party
देशमुखांचा हा नवा राजकीय प्रवास भाजपच्या नेत्यांना महानगरपालिका निवडणुकीत आव्हान देणारा आहे.