चंद्रपूर - जिल्ह्यात व चंद्रपूर शहरात मागील काही दिवसांपासून भाईगिरी चे प्रमाण वाढत असून क्षुल्लक कारणावरून मोठा वाद निर्माण होत आहे.
असाच एक भयावह प्रसंग कांग्रेसचे माजी शहर अध्यक्ष नगरसेवक नंदू नागरकर यांच्यासोबत घडला.
नेहमीप्रमाणे नागरकर हे सकाळी फिरायला जातात, त्यानंतर मित्रांसमवेत गप्पा केल्यावर ते घरी जायला निघाले.
Cowardly attack on former Congress president
Cowardly attack on former Congress president
रघुवंशी कॉम्प्लेक्स समोरील सार्वजनिक शौचालय जवळून ते आपल्या दुचाकीने घरी जात असताना सुसाट वाहन चालविणाऱ्या युवकाला नागरकर यांनी हटकले असता तो मुलगा नागरकर यांच्याशी वाद घालू लागला, त्यानंतर त्या मुलाने आपल्या 2 मित्रांना बोलाविले व नागरकर यांची वाट अडवून सरळ मारहाण करायला लागले.
नागरकर यांना खाली पाडत लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत ते युवक तिथून पळून गेले. रक्तबंबाळ अवस्थेत नागरिकांनी नागरकर यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. Congress corporater
ओळख न व्हावी यासाठी त्या मारहाण करणाऱ्या युवकांनी स्वतःचा चेहरा कपड्याने झाकून ठेवला होता, ऐन मनपा निवडणुकीच्या तोंडावर नागरकर यांच्यावरील हा हल्ला कुणाच्या सांगण्यावरून तर झाला नाही ना? अश्या चर्चेला आता उधाण मिळाले आहे. नागरकर यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. Election
नागरकर यांच्यावरील झालेला हा हल्ला पालकमंत्री व खासदार यांना सरळ भाईगिरी चे आव्हान असल्या सारखा आहे.
