News34 chandrapur
चंद्रपूर - सोमवारी इरई नदीच्या पत्रातून रेतीचा अवैध उपसा सुरू असताना नांदगाव येथील मारोती गेडामला जीव गमवावा लागला.मारोतीला मंगळवारी( 1 मार्च) ला किमान 400 मजुरांनी काम बंद ठेवून निरोप दिल्याने इरई नदीचे ते पात्र ओसाड पडले होते.
दरम्यान मारोती गेडामच्या कुटुंबियांना ट्रॅक्टर मालकाने 3 लक्ष रु आर्थिक मदत दिल्याने वातावरण शांत झाले आहे. असे असले तरी या घटनेस नेमकं जवाबदार कोण हा प्रश्न अनुत्तरित आहे.या संदर्भात पोलिसांची कारवाई जाणून घेण्यासाठी पोलीस निरीक्षक अंभोरे यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही. Sand mafia active in chandrapur
रात्रीचे उत्खनन कसे थांबवावे....?
इरई पत्रात अवैध उत्खनन चालते याची कल्पना आहे. बरेच वेळा कारवाई केली.ट्रॅक्टर जप्त करून लिलाव केले. पण त्या क्षेत्रात रात्री कारवाई करणे शक्य नाही. तिथे शासकीय वाहन जात नाही.मारोती गेडामच्या मृत्यूची तक्रार पोलिसांना करून तपास करायला सांगितले. पण,तपास सुरू झाला की नाही कल्पना नाही. Labour die
निलेश गौंड
तहसीलदार,चंद्रपूर
तहसीलदार गौंड म्हणतात रात्री कारवाई करणे शक्य नाही, पण मारोतीचा मृत्यू हा दिवसा 4 वाजेदरम्यान झाला, कमीतकमी त्यावेळी कारवाई केली असती तर मारोतीचा नाहक बळी गेला नसता.
