News34 Gadchandur
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
गडचांदूर जवळील Manikgad पहाडवर विराजमान शंकर देव मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त दरवर्षी यात्रा भरते.मोठ्यासंख्यने दूरदूरून भाविक भक्त याठिकाणी येतात.मात्र कोरोनामुळे यंदा यात्रा रद्द करण्यात आली असून दर्शनासाठी सूट देण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर 1 मार्च रोजी नांदा येथील एक व्यक्ती दुपारच्या सुमारास पत्नी व लहान मुलीसह दुचाकीने येत असताना गडचांदूर महामार्गावरील रावी पेट्रोल पंपाजवळ विरूद्ध दिशेने भरधाव वेगाने येत असलेल्या दुचाकीने याला जोरदार धडक दिली.यात दोघेही दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाले. Mahashivratri
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना उपचारासाठी गडचांदूर ग्रामीण रुग्णालय येथे पाठवले. प्रकृती गंभीर असल्याने अपघातग्रस्तांना चंद्रपूर येथे पाठविण्यात आले. मात्र यातील एका दुचाकीस्वाराचा वाटेतच मृत्यू झाल्याची माहिती असून दुसर्यावर उपचार सुरू आहे.घटनेचा पुढील तपास गडचांदूरचे ठाणेदार सत्यजित आमले यांच्या नेतृत्वात सुरू आहे.हल्ली शहरातील मूख्य रस्ते व परिसरात वेगवान दुचाकीस्वारांनी अक्षरशः हैदोस घातल्याने जीव मुठीत घेऊन रस्त्यावर चालावे लागत आहे. वास्तविक पाहता बेभान व बेदरकारपणे दुचाकी चालवणाऱ्यांवर अंकुश लावण्याची गरज आहे.मात्र Traffic Police निव्वळ बघ्याच्या भुमीका वठवत असल्याने अपघाताची मालिका सतत सुरूच आहे.
