चंद्रपूर - रशियाने युक्रेनवर युद्ध लादले असून आता कीववर रशियन सैनिकांनी हल्ला करण्यास सुरूवात केली आहे. या युद्धात अनेक भारतीय विद्यार्थी अडकले असून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.kharkiv national medical university indian students
विदेश मंत्रालयाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. युक्रेनच्या खारकीवमध्ये गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.russia war news विदेश मंत्रालय मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे. मृत विद्यार्थ्याचे नाव नवीन शेखरप्पा असून तो कर्नाटकच्या हावेरी जिल्हाचा रहिवासी आहे. नवीन हा खारकीव नॅशनल मेडिकल विद्यापीठात शिकत होता. हे विद्यापीठ युक्रेनच्या आर्किटेक्टोरा बेकाटोवा शहरात आहे. Russia Ukrain War
नवीन च्या मृत्यूने NSUI आक्रमक झाली असून चंद्रपुरात नवीन च्या मृत्यूचे पडसाद बघायला मिळाले.
Nsui चे राष्ट्रीय सचिव रोशन लाल यांच्या नेतृत्वात कॅडलं मार्च काढून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. Indian Student Death in Ukraine
कॅडलं मार्च दरम्यान NSUI रोशन लाल यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र करीत एकीकडे रशिया-युक्रेनच्या युद्धात विद्यार्थी अडकले तर भारतात पंतप्रधान मोदी निवडणुकीत अडकले आहे, मागील एक महिन्यापासून युद्ध सदृश्य परिस्थिती असताना सुद्धा भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारतर्फे काही उपाययोजना करण्यात आल्या नाही, सरकारच्या ढिसाळ नियोजनाचा नवीन हा विद्यार्थी बळी ठरला आहे. navin shekharappa
सरकारचे संपूर्ण नियोजन चुकीचे ठरले आहे.
यावेळी नवीन शेखरप्पा या विद्यार्थ्याला श्रद्धांजली देण्यात आली.
