चंद्रपूर - दिनांक 8 मार्च 2022 ला जागतिक महिला दिन साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून चंद्रपूर शहर महिला व युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज दिनांक 8 मार्च ला चंद्रपूर शहरातील चांदा क्लब ग्राउंड वरोरा नाका येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पक्ष निरीक्षक प्रवीण कुंटे पाटील व चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड यांनी उपस्थित महिला पदाधिकारी व सर्व महिला व युवती स्पर्धकांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर स्पर्धेला सुरुवात करण्यात आली या रांगोळी स्पर्धेमध्ये 98 स्पर्धकांनी सहभाग घेतला स्पर्धेला एक तासाचा अवधी देण्यात आला. स्पर्धकांनी आपल्या कला गुण सादर करीत अप्रतिम रांगोळी तसेच कलाकृती चे रांगोळीच्या माध्यमातून जमिनीवर उतरविल्या त्यामध्ये पवार साहेब यांच्या बुटाची लेस बांधतांना सुप्रियाताई सुळे, लतादीदी मंगेशकर, आई आणि मुलगी सितार वादन करताना, गणेश जी तसेच मुलींचे बालपणापासून तर वृद्धावस्था अशा अनेक अनेक प्रकारच्या सुंदर कलाकृती महिला व युवतींनी सादर केल्या. स्पर्धेचा एक तासाचा अवधी संपल्यानंतर रांगोळी स्पर्धेचे निरीक्षक किरण बलकी ताई तसेच वर्षाताई दत्तात्रय यांनी रांगोळी स्पर्धेचे निरीक्षण केले त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या जयश्रीताई गावंडे कापसे यांचा महिला अध्यक्ष शालीनिताई महाकलकर आणि कार्याध्यक्ष चारुशीला ताई बारसागडे यांच्या वतीने त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला उपस्थित चंद्रपूर शहराचे निरीक्षक प्रवीण कुंटे पाटील साहेब आणि शहराची जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड यांचे पुष्पगुच्छ देऊन महिला अध्यक्ष महाकुलकर ताई तसेच कार्याध्यक्ष चारुशिला बारसागडे ताई यांनी स्वागत केले उपस्थित सर्व स्पर्धकांना चंद्रपूर शहर महिला व युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले. World woman's day
त्यानंतर आई आणि मुलगी ह्यांचे सुंदर कलाकृती काढणाऱ्या युवतीला प्रथम पारितोषिक 5555 तसेच बालपणापासून वृद्धावस्था अशी कलाकृती काढणाऱ्या युवतीला द्वितीय बक्षीस 3333 देण्यात आले लतादीदींची अप्रतिम कलाकृती काढणाऱ्या युवतीला तृतीय बक्षीस 2222 देण्यात आले आणि सितार वादन करताना गणेश जी की कलाकृती काढणाऱ्या स्पर्धकाला चतुर्थ 1111 रुपयाचे बक्षीस देण्यात आले. Ncp
जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या वेळेस प्रमुख उपस्थिती म्हणून शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड विधानसभा अध्यक्ष सुनील काळे महिला शहराध्यक्ष शालिनीताई महाकुलकर, महिला कार्याध्यक्ष चारुशीला ताई बारसागडे, युवती शहराध्यक्ष अश्विनी तालापल्लीवार, विधानसभा अध्यक्ष महिला अंजली परकरवार ज्येष्ठ नेते हिराचंद बोरकुटे, आरिकर साहेब ,प्रीती लभाने, प्रीती मडावी,माया पटले,मीना जमदाडे, राणी राव, शिल्पा कांबळे, करुणा येचालवार, योगिता भडके, स्वाती दुर्गामवार,हेमांगीनी, शहर महासचिव संभाजी खेवले,धनंजय दानव,सेवादल अध्यक्ष किसन झाडे, उद्योग सेल चे अध्यक्ष प्रवीण जुमडे, राहुल देवतळे, अभिनव देशपांडे, केतन जोरगेवार, विपील लभाने, अमित गावंडे तसेच स्पर्धकां सोबत त्यांचे पालक वर्गाची उपस्थिती होती रांगोळी स्पर्धेचे संचालन युवती सचिव नम्रता रायपुरे ह्यांनी केले.