News34 ballarpur
बल्लारपुर- 8 मार्च जागतीक महिला दिवस म्हणुन संपूर्ण देशात पाळला जातो या मंगलमय दिनाचे औचित्य साधून व मनसेचे संस्थापक अध्यक्ष सन्मानिय Raj Thakrey राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन MNS मनसे महिलासेना बल्लारपुर तालूका अध्यक्ष कल्पना पोर्तलावार यांचे संकल्पनेतून तसेच मनसेच्या महिलासेना चंद्रपुर जिल्हाध्यक्षा सौ.सुनिताताई गायकवाड,मनसेचे जिल्हासचिव किशोर मडगुलवार (बल्लारपूर विधाणसभा), यांच्या प्रमुख उपस्थीतीत बल्लारपुरातील तब्बल चाळीस महिलांनी जागतीक महिला दिनी मनसेमध्ये प्रवेश करीत मनसेचा झेंडा हाती घेतला.
Woman's day
Woman's day
यावेळेस शालीनी मेश्राम यांना मनसे महिला सेना तालूका उपाध्यक्ष तर यशोदा मंचर्लावार यांना महिला सेना शहर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देन्यात आली सदर कार्यक्रमाला महिला सेना जिल्हाध्यक्ष सौ.सुनिताताई गायकवाड,मनसेचे जिल्हासचिव किशोर मडगुलवार,मनसे महिलासेना जिल्हासचिव अर्चना आमटे,मनसेचे रुग्नमित्र क्रिष्णा गुप्ता, प्रविण शेवते,राज वर्मा,वाणिताई वर्षा भोमले सदालावार,मनसेच्या महिलासेना बल्लारपूर तालूका अध्यक्षा कल्पनाताई पोर्तलावार,बल्लारपूर मनविसे शहर अध्यक्ष प्रविण दासारपु,बल्लारपूर महिलासेना शहराध्यक्ष मंगला घडले, शहर सचिव वरलक्ष्मी जनरलावार तसेच मनसेचे पदाधिकारी व मनसैनिक प्रामुख्याने उपस्थीत होते.