News34 chandrapur
चंद्रपुर - हृदयी अमृत नयनी पाणी स्त्री जन्माची ही करून कहाणी ही पुरुषप्रधान संस्कृतीची देणं असून ही महिला आपल्या कार्यकर्तृत्वाने आपले अस्तित्व सिद्ध करतात तेव्हा समाजाने त्यांना हतोत्ससाहित न करता त्यांच्या कार्यकौतुकाची पावती स्वरूपात शाबासकीची पाठीवर थाप लाभल्यास महिला प्रगतीपथावर पोचतील असे प्रतिपादन चंद्रपुरातील भारतीय नृत्यकला प्रशिक्षिका व मार्गदर्शिका मृणाल गंगशेट्टीवार यांनी त्याच्या सत्काराला उत्तरं देताना मनोगत मांडले.
मदतीचा हात व विकलांग सेवा संस्थाच्या संयुक्त विद्यमाने World Woman Day चे औचित्य साधून समाजातील सामाजिक, सांस्कृतिक व उद्यमशील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार समारंभात मृणाल गंगशेट्टीवर,वैष्णवी कथलकर ,शीतल इटनकर,स्नेहा मानकर,नाट्य कलावंत साधना शेलार चव्हाण ,मानवाधिकार कार्यकर्त्या निशा धोंगले, संगीता ठोसरे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुछ व मानपत्र देवुन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. woman day wishes
यावेळी रक्तदान चळवळीतील योद्धा सुभाष तेटवार यांचा ७० वेळ blood donation केल्याबद्दल तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप अडकीने यांनी गरजू महिलेला आर्थिक मदत केल्याबद्दल त्यांनाही कृतज्ञता सत्कार स्वरूपात भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमात इंजिनिअरिंग कालेजचे प्रा राजेश पेचे द्वारा एका गरजू विद्यार्थिनीला नवीन cycle मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आली. woman day special
कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या शोभा खोडके,रवी चव्हाण,ललिता मुफकलवार, प्रसाद पा न्हेरकर ,रवी चव्हाण ,सुभाष तेट वार,देवरावजी कोंडेकर, पूजा पा न्हेरकर ,इंजि चव्हाण इत्यादींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सांगता निशा धोंगले ह्यानी इतनी शक्ती हमे देना दाता मन का विश्वास कमजोर हो ना ह्या प्रार्थना गीताने झाली .कार्यक्रम यशस्वीसाठी खुशाल ठलाल, पूजा तिवारी,अनुराधा मेश्राम यांचे सहकार्य लाभले.