चंद्रपूर - पालिकेत असलेल्या अनुपस्थिती वर महापौर राखी कंचर्लावार यांनी तत्कालीन आयुक्त राजेश मोहिते यांची तक्रार थेट नगरविकास मंत्री यांच्याजवळ केली होती.
त्यानंतर चंद्रपूर मनपात आयुक्त विरुद्ध महापौर यांचा वाद चांगलाच रंगला होता, मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोहिते यांची मुंबईला बदली करण्यात आली होती. Chandrapur municipal corporation commissioner
त्यांच्या जागेवर विपीन पालिवाल यांनी चंद्रपूर मनपा आयुक्तांचा पदभार स्वीकारला मात्र 2 महिन्यांनी पालिवाल यांची उचलबांगडी करीत पुन्हा राजेश मोहिते यांची चंद्रपूर मनपात एन्ट्री झाली आहे. Rajesh mohite entry
11 मार्चला तसे आदेशही जारी करण्यात आले, सध्या आयुक्त यांच्या बंगल्यावर 40 लाख खर्च केल्याचा ठपका मनपावर बसला आहे, बंगला मालकीचा नसताना सुद्धा पालिकेने जनतेच्याया करातील 40 लाख रुपयांची उधळपट्टी केली असा आरोप नगरसेवक पप्पू देशमुख यांनी लावला आहे. News34
आता पालिका पदाधिकाऱ्यांचा वाद झालेल्या आयुक्तांची पुन्हा चंद्रपूर मनपात वर्णी लागत आहे. अश्यात एप्रिल महिन्याच्या शेवटी चंद्रपूर मनपात Administrator बसण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे.