news34
बल्लारपूर - शहरातील आंबेडकर वार्डात राहणारा रामेश्वर कालीचरण निषाद हा युवक रात्री 11 वाजताच्या सुमारास राजुरा वरून परत येत असताना वर्धा नदीवरील पुलावर वाहनांच्या प्रकाशाने युवक दुचाकी सह नदीत पडला. overbridge accident10 मार्चला रात्री रामेश्वर व त्याचा मित्र सूरज सोनारकर हे दोघे राजुरा येथील धाब्यावर जेवण केल्यानंतर परत दोघेही बल्लारपूर कडे परत येत असताना वर्धा नदीवरील पुलावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाचा प्रकाश रामेश्वर यांच्या डोळ्यावर पडला असता त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. wardha river
त्यानंतर भरधाव वेगात असलेली दुचाकी वर्धा रामेश्वर सहित वर्धा नदीत पडली, यावेळी सूरज सोनारकर हा पुलावर कोसळला. fell under the bridge with the bike
दुसऱ्या दिवशी पोलिसांनी रामेश्वरचा शोध घेतला असता त्याची दुचाकी पोलिसांना आढळली मात्र रामेश्वरचा अद्यापही पत्ता लागला नाही. The bike fell under the bridge
विशेष म्हणजे मागील अनेक वर्षापासून या पुलावर लोखंडी रेलिंग नसल्याने अनेक अपघात घडले, त्यानंतरही संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. wardha river