News34 (गुरू गुरनुले)
मुल - हजारो कोटी रुपये खर्च करुन शेतकऱ्यांच्या हितासाठी बांधण्यात आलेल्या आसोला मेंढा (गोसेखुर्द) प्रकल्प अजूनही शेतकऱ्यांच्या हिताचा ठरल्याचे दिसत नाही. प्रसंगी सावली तालुक्यातील मौजा खेडी साजातील अनेक शेतकरी बांधव तलावाच्या पाण्यापासून वंचित आहेत. पाणी केंव्हा मिळणार याबाबत सावली येथील सहायक अभियंता श्रेणी-१ आसोला मेंढा प्रकल्प नूतनीकरण उपविभाग क्र.८ सावली यांच्या कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधून व विनंती अर्ज करुन पाण्याबाबत विचारणा केली असता मौजा खेडी साजातील भूमापन क्रमांक २४७, २४८/१, २४६, २४५, २४४, २४३, २४२, २४१,२४०,२८४ या भूमापण क्रमांका लगत अन्य भूमापक शेतकरी यांना संबंधित विभागाने काम पूर्ण करण्याचा कंत्राट्ट देण्यात आलेला असून सध्या कोविड-१९ मुळे शासनाकडून पाईप लाईन व अन्य साहित्य पुरवठा होत नसल्याने काम अडून असल्याचे सांगितले जात आहे. याही वर्षी विचारणा केली असता जानेवारी २०२२ पर्यंत काम पूर्ण नक्कीच होणार असे सांगून शेतकऱ्यांचे समाधान केल्या गेले.परंतु मार्च २०२२ पूर्ण होत आहे तरीदेखील शिल्लक असलेल्या कामाला सुरुवात झाल्याचे दिसत नाही. चालू २०२२ या वर्षाच्या खरीप हंगामा करीता ज्या शेतकऱ्यांना अजूनही पाणी मिळालेले नाही. संबंधित भूमापक क्रमांकाच्या परिसरात पाईप लाईन टाकण्यात आली आहे काही ठिकाणी पाण्यासाठी वॅलही दिलेले आहे. परंतु आतापर्यंत पाणी पुरवठा करण्यात आलेला नाही. तसेच त्याच परिसरातील काही शेतकऱ्यांना अजूनपर्यंत वालही देण्यात आलेला नाही. तेही शेतकरी बांधव पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. करीता यावर्षीचा हंगाम सुरु होण्यापूर्वी संबंधित भूमापक क्रमांक धारक शेतकऱ्यांना आसोला मेंढा (गोसेखुर्द) प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतीला कसे देता येईल यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहानुभूती पूर्वक प्रयत्न करावे. आणि ज्या ठेकेदाराला काम देण्यात आले आहे त्यांचेकडून अपूर्ण असलेले काम त्वरित पूर्ण करुन घेण्याची सर्वस्वी जबाबदारी काम देणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा दोष नाही. पुन्हा यावर्षी ठेकेदाराने काम केले नाही हे कारण अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसमोर पुढे करु नये. अशी मागणी खेडीसाजातील संबंधित भूमापक शेतकरी बांधवांनी केली असून, जर का यावर्षीच्या हंगामाला शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळाले नाही तर शेतकऱ्यांनी जनआंदोलना सारखा मार्ग स्वीकारल्या शिवाय राहणार नाही.