News34
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
मोदीजींच्या काळामध्ये युपीचा झालेल्या विकासाबद्दल लोकांमध्ये मोठा आनंद होता.आणि सर्वात मोठा आकर्षण जे लोकांमध्ये होते ते कायदा व सुव्यवस्थेत Yogi जींना आलेले फार मोठे यश.कारण की त्याठिकाणी महिलांना,मुलींना बाहेर फिरणे कठिण होते.व्यापाऱ्यांना फिरवती मागणारे मोठे ग्रुप होते.ते योगींच्या काळात सगळेच संपले,तुरूंगात आहे.तो एक प्रभावी विषय बनल्यामुळे आम्हाला,भाजपला विजय मिळाला.आजच्या घडीला भाजपच्या तोडीचा पक्ष उत्तर प्रदेशात नाही,देशात नाही,ही स्थिती निर्माण झालेली आहे.
भाजप जिंकणार आणि भाजपच्या तोडीचा कोणी पक्ष नाही आणि मोदीजींच्या तोडीचा कोणी पंतप्रधान पदाचा उमेदवार ही या देशामध्ये अन्य पक्षात नाही,असा दावा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केला.ते 20 मार्च रोजी गडचांदूरच्या दौऱ्यावर आले असता येथील हॉटेल चांदनी चौक येथे भाजपतर्फे आयोजित एका छोटेखानी सत्कार कार्यक्रमात बोलत होते. Bjp Obc Morcha
नुकतेच 5 राज्यात विधानसभा निवडणूका पार पडल्या.त्यामध्ये भाजपने 4 ठिकाणी घवघवीत यश प्राप्त केले.हंसराज अहीर हे 2 महिने उत्तर प्रदेशात होते. त्यांनी त्याठिकाणी ओबीसी मोर्चाचे प्रभारी म्हणून काम पाहिले. आणि त्यांचा सुद्धा या विजयात खारीचा वाटा आहे,असे आम्हाला वाटते.एक कार्यकर्ता म्हणून त्यांचा उत्साह वाढवने आमचे सुद्धा काम आहे.म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला. Hansraj ahir
अशी प्रतिक्रिया भाजप शहराध्यक्ष सतीश उपलेंचीवार यांनी सदर प्रतिनिधीला दिली.सत्कार करताना सतीश उपलेंचीवार,गडचांदूर न.प.नगरसेवक रामसेवक मोरे, नगरसेवक अरविंद डोहे,जेष्ठ नेते शिवाजी सेलोकर, महादेव जयस्वाल, राकेश अरोरा,होमदेव आवारी, महादेव एकरे,रोहन काकडे, महेताब सर, योगेंद्र केवट इतरांची प्रमुखाने उपस्थिती होती. Follow news34 in Google news