चंद्रपूर - चंद्रपूर शहरातील शितल मेहता या तरूणीच्या संशयास्पद मृत्युची सखोल चौकशी करण्यात यावी व चौकशीच्या निष्कर्षाच्या अनुषंगाने दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभागृहात केली.
हा विषय अतिशय गंभीर असून महिलांच्या सुरक्षीततेशी निगडीत असल्यामुळे शासनाने त्वरीत याबाबत निवेदन करावे, असे निर्देश पिठासीन अधिका-यांनी दिले. Suspicious death
दिनांक २१ मार्च २०२२ रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वरील घटनेच्या अनुषंगाने विधानसभेत स्थगन प्रस्तावाची सुचना दाखल केली होती. सदर तरूणीचा अपघात नसून घातपाताचा प्रकार असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये विशेषतः महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. Demand in the Legislative Assembly
कायदा व सुव्यवस्थेसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले असल्याची भावना आ. मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली.