News 34 chandrapur
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
औद्योगिक नगरीच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहराला हल्ली प्रदूषित शहर म्हणून ओळखले जात आहे.याचे संपूर्ण श्रेय येथील माणिकगड सिमेंट कंपनीला जाते. सदरची कंपनी जेव्हापासून शहरात सुरू झाली तेव्हापासून पुर्वी ग्रामपंचायतचा काही काळ वगळला आणि आता नगरपरिषदेत काँग्रेसची सत्ता आहे.आणि याकाळातच माणिकगड सिमेंट कंपनीला विवीध कामांसाठी वेळोवेळी ना-हरकत दिल्याचे कळते.
असे असताना या सिमेंट कंपनीने येथील नागरिकांच्या जीवाशी खेळ चालवला आहे.या कंपनीतून होणार्या वायू प्रदूषणामुळे शहरवासी अक्षरशः त्रस्त झाले असून विविध आजाराने ग्रासले आहे.अनेकदा संबंधित विभागाकडे तक्रार करण्यात आली मात्र काहीच सकारात्मक परिणाम दिसून आला नाही. Gadchandur dust pollution
अखेर नागरिकांनीच प्रदुषणाविरोधात एक कृती समिती तयार केली. या समितीचे वैशिष्ट्य म्हणजे यात एकाही मुस्लिम व्यक्तीचा समावेश नाही.
हे ही वाचा - गडचांदूरकरांची पुन्हा निराशा
इतर काही राजकीय पक्ष व समाजसेवकाचा अपवाद वगळता शहरातील व बाहेरील काँग्रेस नेते व काँग्रेस प्रेमींचा भरणा जास्त आहे. Political
प्रदुषणाविधात आंदोलन सुरू असताना व प्रदूषित असा गडचांदूर शहरात 26,27,28 मार्च रोजी दृढ संकल्प स्पोर्टिंग कलब गडचांदूर व भीमसेन बहुउद्देशीय सुधार संस्था गडचांदूरतर्फे "आमदार चषक" भव्य खुले आॕल इंडिया व्हॉलीबॉल सामने आयोजित करण्यात आले आहे.याचे उद्घाटन आमदार सुभाष धोटे करणार आहे तर इतर मान्यवरांसह "माणिकगड सिमेंट कंपनीचे युनिट हेड उदय पवार व वरिष्ठ अधिकारी मयंक श्रीवास्तव" यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. सदर चषकासाठी manikgad cement कंपनीकडून मोठी मदत मिळाल्याची खमंग चर्चा शहरात ऐकायला मिळत असून एकीकडे प्रदुषणाविरोधात माणिकगड सिमेंट कंपनीच्या विरोधात एकत्रितपणे लढा उभारायचा आणि दुसरीकडे याच कंपनीच्या प्रमुख व्यक्तिंना आमंत्रित करायचे,हे न उलगडणारे कोडे असले तरी "येतो पब्लिक है,सब जानती है" अशी उपहासात्मक चर्चा सुरू आहे. प्रदुषणाला वाचा फोडण्यासाठी नागरिकांनी कृती समिती तयार केली.मात्र ही समिती प्रदूषणाचा प्रश्न विधानसभेत न मांडणाऱ्या विद्यमान लोकप्रतिनिधीला जाब विचारत नाही ! विशेष म्हणजे समितीतील काही महत्वाचे सदस्य आमदारांच्या पक्षाचे व आमदार चषकाच्या आयोजन समिती सदस्य असल्याने कृती समितीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर याठिकाणी प्रदुषणाच्या नावाने सामान्य नागरिकांचा व्यवस्थितपणे राजकीय वापर होत असल्याचे लक्षात घेता येथील भाजपचे विद्यमान नगरसेवक अरूण डोहे व त्यांची पत्नी माजी नगराध्यक्षा सौ.विजयालक्ष्मी डोहे दोघेही कृती समितीतून बाहेर पडले आहे.परंतू आगामी काही दिवसांत या मुद्द्यासाठी आंदोलन,मोर्चे व कायद्याच्या माध्यमातून लढा तीव्र करणार असल्याचे त्यांनी सांगितले हे मात्र विशेष.
