News 34 chandrapur
चंद्रपूर - महानगरपालिकेच्या नियोजन शुन्य कारभारामुळे यंदाही चंद्रपूरकरांची 42 डिग्री तापमाणात पाण्यासाठी चांगलीच पायपीट होत आहे. ही बाब लक्षात घेता दरवर्षी प्रमाणे यंदाही नागरिकांच्या सेवेसाठी यंग चांदा ब्रिगेडचे जलसेवा रथ आज पासून सक्रिय झाले आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई (अम्मा) यांनी या जलरथला हिरवी झेंडी दिली.
Green flag त्यानंतर सदर जलसेवा रथ शहरात पाणी पुरवठा करण्यासाठी रवाणा झाले आहे. Water crisis in summer
यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे शहराध्यक्ष पंकज गुप्ता, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष सलीम शेख, युवा नेते अमोल शेंडे, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहराध्यक्ष राशेद हुसेन, सायली येरणे, आशा देशमुख, विमल कातकर, अल्पसंख्याक विभागाच्या महिला शहराध्यक्ष कौसर खान, शमा काजी, सविता दंडारे, वैशाली मेश्राम, आनंद रणशूर, विलास सोमलवार, दुर्गा वैरागडे आदिंची उपस्थिती होती. Young chanda brigade
यंदाचा उन्हाळाही summer नागरिकांसाठी पाणी संकट घेऊन आला आहे. मागील सहा दिवसांपासून शहरातील पाणी पुरवठा बंद असल्याने नागरिकांचे पाण्याअभ्यावी हाल होत आहे. असे असतांनाही मनपा प्रशासन सुस्त अवस्थेत दिसुन येत आहे. एकीकडे नागरिकांचे पाण्याची नळ कोरडी आहे. तर दुसरीकडे टॅंकरच्या माध्यमातून पाणी पूरवठा करण्यातही मनपा प्रशासन पूर्णत: अपयशी ठरले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा यंग चांदा ब्रिगेड पूर्ण क्षमतेने समोर आली असून त्यांच्या वतीने जलसेवा रथ सुरु करण्यात आला आहे. Chandrapur news
या जलसेवा रथ माध्यमातून शहरातील प्रत्येक गल्ली पिंजून काढण्यात येणार असून शहरात पाणी पोहचविण्यात येणार आहे. सदर जलसेवा रथावर संपर्क नंबरही टाकण्यात आला असून गरजूंनी या क्रमांकावर पाण्यासाठी संपर्क करावा असे आवाहण यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे. प्रत्येक भागात हा रथ पोहचावा यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने नियोजन करण्यात आले असून वार्ड समितींची नेमणूक करण्यात आली आहे. पाणी टंचाई दुर होईपर्यंत या जलसेवा रथाच्या माध्यमातून सेवा दिली जाणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगीतले असून आवश्यकता असल्यास जलसेवा रथांची संख्या वाढवा अशा सुचनाही आमदार किशोर जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहे.