News34 chandrapur
गडचांदूर - दिनांक 26.03.2022 रोजी बल्लारशाह विभागातील गडचांदुर उपविभागातील कृषीग्राहकांसाठी गडचांदुर उपविभाग येथे कृषी मेळावा घेण्यात आला. Msedcl
याप्रसंगी सुहास रंगारी, प्रादेशिक संचालक, नागपुर, सुनील देशपांडे, मुख्य अभियंता, चंद्रपुर परिमंडल, दाहेधार मुख्य महाव्यवस्थापक वित्त व लेखा, प्रादेशिक कार्यालय, नागपुर, श्रीमती संध्या चिवंडे, अधीक्षक अभियंता, चंद्रपुर मंडल, संदेश ठवरे, कार्यकारी अभियंता,बल्लारशाह विभाग, महेश तेलंग, अतिरिक्त कार्यकारी अभियंता,बल्लारशाह विभाग आणि गडचांदुर उपविभाग येथील सर्व अभियंता व येथील सर्व कर्मचारी हे प्रामुख्याने उपस्थित होते.
महाकृषि ऊर्जा धोरणा अंतर्गत कृषिग्राहकांना वीजबिलाबाबत तक्रारींचे जागेवरच निराकरण होण्यासाठी power minister ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून महाकृषि ऊर्जा धोरण 2020 (Mahakrishi Energy Policy) नुसार कृषिपंपाच्या वर्षानुवर्ष थकीत असलेल्या वीजबिलांमधून फक्त निम्मी थकबाकी भरून, थकबाकीमुक्त होण्यासाठी आता केवळ 4 दिवस राहिले असून कृषी धोरणाअंतर्गत ग्राहकांनी 31 मार्च पुर्वी थकबाकी भरल्यास त्यांना 66 टक्के माफीची सुवर्ण संधी 31 मार्चपर्यंत असल्याने मार्चपुर्वी सवलतीत थकबाकी भरून कृषिग्राहकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. सुहास रंगारी यांनी या मेळाव्यातून केले. Agricultural consumer
गडचांदूर येथे पार पडलेल्या मेळाव्यात श्री.सुहास रंगारी, प्रादेशिक संचालक, नागपुर यांच्या हाकेला प्रतिसाद देत 216 कृषिग्राहकांनी 35 लाख 62 हजार 380 एवढी रक्कम भरून थकबाकी मुक्ती कडे पाऊल टाकले. तसेच एकूण 81 ग्राहकांनी पूर्ण थकबाकीचा भरणा करत पूर्णत: थकबाकी मुक्त झाले. या मेळाव्यात 11 ग्राहकांच्या वीजबिल तक्रारी महावितरण गडचांदूर उपविभागाने सोडवल्या. तसेच घरगुती, वाणिज्यीक ग्राहकांनी 2 लाख 40 हजार रुपयांचा भरणा केला. उच्चदाब ग्राहक गुरुदेव कॉटन प्रोसेसिंग कंपनी यांच्याकडून 2 लाख 83 हजार 190 रुपयांचा व उच्चदाब ग्राहक स्वप्नपूर्ति फूड प्रोडक्ट प्राइवेट लिमिटेड यांच्याकाडून 2लाख 76 हजार 950 रुपयांचा भरणा करण्यात आला. अशाप्रकारे आजच्या मेळाव्यात एकुण 43 लाख 60 हजार ग्राहकांकडून भरण्यात आले.
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात मध्ये /मंडळात, मार्च दरम्यान, तालुका /उपविभागनिहाय मेळावे घेण्यात येत आहेत. कृषिवीजबिल थकबाकी व वीजबिलांच्या तक्रारींचे निवारण होणे असा दुहेरी लाभ, कृषिग्राहकांना या मेळाव्यात एकच छताखाली मिळत आहे.
