चंद्रपूर - शिवसेना वैदाकिय मदत कक्ष तथा डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन तसेच चंद्रपूर शिवसेना, युवतीसेना आणि महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर शहरातील पंचतली हनुमान मंदिर येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिरात प्रमुख पाहुणे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश जी चिवटे, शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे तथा युवासेना सह सचिव हर्षल काकडे, चंद्रपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष मझर अली, रक्तदुत हकीमभाई हुसेन यांची उपस्थिती होती.
या शिबिरास चंद्रपूर जिल्हा शल्य चिकित्सक श्री. निवृत्ती राठोड सर यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहयोग लाभला तसेच जनरल मेडिकल प्रॅक्टिशनर अससोसिएशन तर्फे अध्यक्ष डॉक्टर श्री. भूपेंद्र लोधीया सर आणि सेक्रेटरी डॉक्टर सिराज खान यांचासुद्धा मोलाचा वाटा साथ लाभली.
या महाआरोग्य शिबिरास 1 हजार नागरिकांनी तपासणी केली तसेच 700 लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आलं संपूर्ण चंद्रपूर शहरातील नागरिकांनी स्वतः येऊन मोट्या प्रमाणात प्रतिसाद देते नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेत सर्व स्तरावर संपूर्ण टीमीचे आभार मानले. नागरिकांना चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्यांदाच अशे आरोग्य शिबिर झाले आणि या सर्व सुविधा तसेच वरील स्तरावरील शस्त्रक्रिया मोफत मिळणे हे सामान्य नागरिकांसाठी खुप अत्यंत गरजेचे होते आणि ते आता शिवसेना या पक्षामार्फत मिळेल याची त्यांना ग्वाही मिळाली. आरोग्य आणि शिवसेना हे एक जणु समीकरण तयार झाले आहे आणि आता येणाऱ्या काळात अशेच शिबिर संपूर्ण ग्रामीण भागात आणि शहरातील प्रत्येक प्रभागात राबविण्यात येणार आहे.
Shivsena health camp
या शिबिरात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संपर्क समन्वयक जितेंद्र सातव आणि राम राऊत, स्वरूप काकडे, ऋषिकेश देशमुख, नितीन हीलाल, सागर झाडे, गजानन नारलावार वैद्यकीय सहाय्यक नागपूर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे समन्वयक सचिन डाखोरे बंटी धूर्वे संदीप रियाल पटेल तसेच ठाण्यातील वैद्यकीय सहाय्यक माऊली धुलमुंदे अरविंद मांडवकर, रवी नांनावरे, राहुल भालेराव, रोहित वायभासे, दिपाली मॅडम, योगेश फणाडे लक्ष्मण सूर्वासे तथा शिवसेने तर्फे प्रमोद पाटील ,विक्रांत सहारे,राहुल बेले ,सोनू ठाकूर, शुभम मालुसरे,करण वैरागडे ,गौरव तेलमासरे ,कुसुमताई उद्गार ,नलगेताई,रोहिणीताई पाटील,यांची साथ लाभली.
