News 34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही - दि.24/3/2022 ला सिंदेवाही तालुक्यातील तांबेगडी मेंढा या गावातील अंगणवाडी जवळील हात पंपावर पाणी भरत असल्याचे एका महिलेला बघून त्याच गावातील एका व्यक्तीने डोळा मारला त्या व्यक्तीने सदर महिलेवर डोळा मारला हे महिलेने बघितले असता तिने थेट आपल्या घरातील पतीला व मंडळींना सांगितले.
या कारणावरून सदर महिलेच्या घरातील मंडळी त्या अंगणवाडी जवळील हातपंपाच्या जागेवर गेले असता त्याठिकाणी असलेले दोघे तिघे व्यक्ती सदरील महिलेच्या पतीशी व सासर्याचे भांडण करून शिवीगाळ करीत मारहाण करू लागले. या कारणावरून सदर महिलेने सिंदेवाही पोलीस स्टेशन गाठून तोंडी रिपोर्ट दिली त्या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी क्रमांक 78 /2022 नोंद करीत तांबेगडी मेंढा येथील सदरील 4 आरोपी विरुद्ध कलम 509, 323 ,504 ,506, भारतीय दंड विधानानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार घारे यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार शंकर राऊत हे करीत आहेत.