News 34 chandrapur
चंद्रपूर, दि.29 मार्च : जिल्ह्यात मंगळवारी (दि.29) एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. जिल्ह्यात एकाने कोरोनावर मात केली असून त्या रुग्णाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर जिल्ह्यात मंगळवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.
Get covid info
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 958 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 97 हजार 389 झाली आहे. सध्या 2 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 93 हजार 417 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 93 हजार 401 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1567 बाधितांचे मृत्यू झाले आहे.
Chandrapur news
प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. Chandrapur covid info