सिंदेवाही - मला ओळखलं काय मी तुमच्या घरचा पाहुणा आहे, चला माझ्यासोबत मी तुम्हाला चप्पल व घड्याळ घेऊन देतो.
तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या मुलांना 41 वर्षीय इसमाने घड्याळीचे आमिष दाखवीत लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला मात्र सदर बाब मुलांच्या कुटुंबियांना कळताच त्या इसमाला जमावाने चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.
Sexual harassment
Sexual harassment
सोमवारी 28 मार्चला तिसऱ्या वर्गात शिकणारे 2 अल्पवयीन मुले घराजवळ खेळत होते, त्यावेळी नागपूर निवासी 41 वर्षीय थामदेव मेंदूळकर याने दोन्ही मुलांना त्यांच्या घरचा पाहुणा असल्याचे सांगत त्यांना घड्याळ व चपलीचे आमिष देत सोबत नेले.
दोघांना मेंदूळकर याने सँडल घेऊन देत बस स्थानकाजवळील हॉटेल मन मंदिर येथील रूम नंबर 102 मध्ये घेऊन गेले. Abuse crime
दोघां मुलांनी रूम मध्ये प्रवेश घेताच मेंदूळकर यांनी दोघांना कपडे काढायला सांगितले मात्र एकाने समय सुचकता दाखवीत शौचाचा बहाणा करीत तिथून पळ घातला.
सायंकाळ झाली मात्र मुले घरी न आल्याने आई-वडिलांनी शोधाशोध घेतली, बस स्थानकाजवळ शोध घेत असताना एक मुलगा रडत असताना त्यांच्याजवळ धावून येत आई वडिलांना संपूर्ण आपबीती कथन केली.
Abuse
तात्काळ मुलांच्या आई वडिलांनी हॉटेल मन मंदिर येथे धाव घेत रूम चा दरवाजा ठोठाविण्यास सुरुवात केली मात्र दरवाजा कुणी उघडत नव्हते, दरवाजा उघडत नसल्याने नागरिकांनी गर्दी करीत दरवाजा तोडण्याची तयारी केली, दरवाजा उघडल्यानंतर अल्पवयीन मुलगा रडत होता, सदर मुलाला बघत आई-वडील व नागरिक संतापले. Sexual abuse
विकृत थामदेव मेंदूळकर याला पकडत जमावाने त्याला चांगलेच बदडले, सदर प्रकार सिंदेवाही पोलिसांना कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली.