चंद्रपूर - जागतिक महिला दिनानिमित्त अनेक संघटना व राजकीय पक्षांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत woman's day महिला दिन साजरा केला मात्र वंचित बहुजन आघाडी महिला शाखेने महिलांच्या हक्कांबाबत महत्वपूर्ण मागणी मनपाला केली.
शहरातील गांधी चौक ते प्रियदर्शनी चौकापर्यंत एकही महिला शौचालय नाही, ही खरचं शोकांतिका आहे, महानगरपालिकेत महिला महापौर असताना सुद्धा महिलांना साधं शौचालय मनपा उपलब्ध करू शकली नाही. Ladies toilet
याबाबत जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधत वंचित बहुजन आघाडी महिला शाखेने पुढील 15 दिवसात मुख्य रस्त्यावर महिला शौचालयाची निर्मिती करावी अन्यथा 15 दिवसांनी संपूर्ण महिला मनपा समोर ठिय्या आंदोलन करणार असा इशारा तनुजा रायपुरे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांनी दिला आहे. Vanchit bahujan aghadi
यावेळी पालिका आयुक्त पालिवाल यांना सदर मागण्यांचे निवेदन देण्यात आले.