News 34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर येथील महाऔष्णिक विद्युत केंद्रात स्थानिकांना रोजगार देण्याचे निर्देश दिले.अशी माहिती शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी शिवसंपर्क अभियानासाठी आले असता चंद्रपूरात पत्रपरिषदेत गुरुवारला दिली. परंतू महाऔष्णिक विद्युतकेंद्रांचे खाजगीकरण केले जात असेल तर, रोजगार कसा मिळणार,विद्यमान कंत्राटी कामगारांचे काय..?राज्य शासन खाजगीकरण थांबवेल काय .?असा प्रश्न विचारला असता,त्यांनी मौन बाळगले.
ते म्हणाले,केंद्र शासन या संदर्भात बिल आणेल तेव्हा बिलातील सुधारणा(अमेंडमेंट)कामगार विरोधी असेल तर शिवसेना विरोध करेल.खा.गोडसे यांचे हे वक्तव्य खाजगीकरनावर शिवसेनेची भूमिका स्पष्ट करणारे होते.
यावेळी शिवसेना सम्पर्क प्रमुख प्रशांत कदम,जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे व मुकेश जीवतोडे,पर्यवेक्षक अशोक मिश्रा,सत्यवान मंचेकर,चंद्रकांत पवार यांची उपस्थिती होती. Shiv Sena Vidarbha tour
खा.गोडसे म्हणाले,हा औद्योगिक जिल्हा आहे.येथे सिमेंट,विद्युत व कोळसा उद्योग आहे,बेरोजगारी संपवायची असेल तर,उद्योगाच्या परिसरातील 52 गावातील बेरोजगारांना प्राधान्य दिले पाहिजे.
Politics
युतीधर्मामुळेच विदर्भात शिवसेनेचे नुकसान : गोडसे
चंद्रपूर : युती धर्मामुळेच विदर्भात शिवसेनेचे नुकसान झाल्याचे मत शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी चंद्रपुरात व्यक्त केले. शिवसेनेच्या शिवसंपर्क (shiv sampark abhiyan) अभियानासाठी तीन दिवसांपासून खासदार गोडसे जिल्ह्यात होते. गेल्या तीन दिवसात 6 विधानसभेतील शिवसैनिकांच्या भेटी घेऊन परिसरातील समस्या, अडचणी जाणून घेतल्या. चंद्रपुरातील शिवसैनिकांना संबोधताना गोडसे यांनी युती धर्मामुळेच विदर्भात शिवसेनेचे नुकसान झाल्याचा गंभीर आरोप केला. यावेळी संपर्क प्रमुख प्रशांत कदम, जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, मुकेश जीवतोडे, युवासेना प्रमुख निलेश बेलखेडे, स्वप्नील काशीकर यांच्यासह हजारो शिवसैनिक उपस्थित होते. BJP-Shiv Sena alliance
विदर्भात होणार शिवसेनेचे कार्यालय
शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून संघटनेची बांधणी केली जात आहे.जिल्ह्यातील 6 पैकी 4 विधानसभा मतदार संघाचा दौरा केला.यात वरोरा-भद्रावती व बल्लारपूर मतदार संघात शिवसेना बाजी मारू शकते.जिल्हा परिषदेत 30% "जागा जिंकू, मनपात 15 ते 20 जागांवर विजय मिळेल.विदर्भात भाजपाने शिवसेनेला मोठे होऊ दिले नाही.पण,आता हे चित्र बदलेल.जनसम्पर्क वाढावा,लोकांची कामे करता यावी, म्हणून आता विदर्भात कार्यालय उभारून लोकांचा मुंबई पर्यंत येण्याचा त्रास कमी करू,अशी माहिती संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांनी दिली.
चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेना वाढत आहे...संदीप गिऱ्हे
शिवसेना सर्व निवडणुका स्वबळावर लढते.त्यामुळे ग्रामीण भागात पोंभुरणा,बल्लारपूर,भद्रावती,नागभीड येथे यश मिळाले.कोणी कुठेही गेला तरी,शिव सैनिक तेथेच असतो,येणाऱ्या निवडणुकीत नेत्रदीपक यश मिळवू.असे शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे म्हणाले.