News34 chandrapur
चंद्रपूर - विदर्भातील ख्यातनाम कवयित्री, लेखिका व समाजसेविका, प्राद्यापक श्रीमती विमलताई गाडेकर यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी 26 मार्चला चंद्रपुरात "विमल दिवस" चे आयोजन करण्यात आले आहे.चंद्रपूर व विदर्भातील अनेक सामाजिक व साहित्यिक चळवळीशी गाडेकर यांचा जवळचा संबंध होता. litterateur आपल्या सामाजिक चळवळीतून त्यांनी अनेक कुटुंबांना उभे केले आहे. चंद्रपूर येथील जनता कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून विद्यादानाचे काम केले आहे. अनेक सामाजिक चळवळीत त्यांचा सहभाग होता. महिलांच्या समस्यांवर काम करणाऱ्या संयुक्त महिला मंचच्या त्या संस्थापक अध्यक्षा होत्या. Vimal gadekar
यासह 'ऋतुबंध ', 'रमाईच्या जीवनावरील चंदनी दरवळ ' प्रातिनिधिक काव्यसंग्रह 'गुलमोहर ', प्रसिद्ध असून 'पार्टी ' कथा संग्रह देखील प्रसिद्ध आहे. अनेक वृत्तपत्रातून त्यांनी स्तंभलेखन केले आहे. विदर्भ साहित्य संघ व अनेक साहित्य संघटनांसोबत देखील त्यांचा नजीकचा संबंध होता.
शनिवारी 26 मार्चला चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात जेष्ठ साहित्यीक सुरेश द्वादशीवार, पालकमंत्री विजय वडेट्टीवार, माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार व डॉ. प्रतिभा वाघमारे यांची उपस्थिती असणार आहे.
कार्यक्रम दरम्यान श्याम पेटकर संपादित प्रा.विमल गाडेकर लिखित अप्रकाशित साहित्य "कोळवेकंच" या पुस्तकाचे व अविनाश पोईनकर, वर्षा पोईनकर संपादित "प्रा.विमल गाडेकर, व्यक्ती आणि वांड्मय या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे.
तसेच विमल गाडेकर लिखित "चंदनी दरवळ" या रमाई वरील खंडकाव्याचे सादरीकरण ऍड.चैताली बोरकुटे व सुशील सहारे करणार आहे.
दुसऱ्या सत्रात निमंत्रितांचे कविसंमेलनाचे आयोजन अमरावतीचे प्रसिद्ध कवी बबन सराडकर यांच्या अध्यक्षतेखाली कवयित्री शोभा रोकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार. Poet convention
यांच्यासह उषाकिरण आत्राम, पद्मरेखा धनकर, श्रीपाद जोशी, किशोर कवठे, मनोज बोबडे, रेवानंद मेश्राम सहभागी होणार आहे. Poetess
प्रा. विमल गाडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित कार्यक्रमाला शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येत आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन डॉ.हेमंत गाडेकर, (कुलसचिव, डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यापीठ, भोपाळ), जयंत गाडेकर (अभिनेता, मुंबई),
अर्चना शंभरकर (वरिष्ठ सहाय्यक संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय), डॉ.मोना पंकज (मुंबई) यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले.