News34 chandrapur
चंद्रपूर दि. 24 मार्च : गत 24 तासात जिल्ह्यात 2 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. जिल्ह्यात गुरुवारी मृत्यु संख्या शुन्य आहे.
Update chandrapur
आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये ब्रह्मपुरी 1, तर चिमूर येथे 1 रुग्ण आढळून आला असून चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र, चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती, नागभीड, सिंदेवाही, मुल, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, राजुरा, वरोरा, कोरपना, जिवती व इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.
Corona cases
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 958 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 97 हजार 388 झाली आहे. सध्या 3 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 91 हजार 698 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 91 हजार 667 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1567 बाधितांचे मृत्यू झाले आहे.
Get covid info
प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.