News34 (गुरू गुरनुले)
मुल - पेटत्या होळीत नैवेद्य टाकून त्याचा आपल्या समाजाला काहीच उपयोग होत नाही उलट आपण एकप्रकारे बळीराजा आपल्या शेतकऱ्यांनी घामातून पिकविलेल्या अन्नाचा अपमानच करत आहोत या भावनेतून गेल्या चार वर्षांपासून होलिका दहनाचे वेळी वार्डातील परिसरातील लोकांकडून होळीमध्ये नैवैद्य म्हणून टाकण्यासाठी जमविलेल्या पदार्थांचे (पुरणपोळी,वडे आणि गाठी) होळी जवळ ठेवण्यात आलेल्या डब्यामध्ये एकत्र जमा करुन मग ते अन्न मूल येथील बसस्थानक परिसरातील कोरकु भटकी जमात वस्तीत जाऊन लहान मुलांना महिलांना, वयोवृध्द नागरिकांना वाटप करुन खाऊ घालण्यात आले.
गेल्या चार वर्षांपासून नैसर्गिक पर्यावरण व मानवता विकास संस्थेच्या मुल शाखेच्या वतीने हा उपक्रम सुरू असल्याने कोरकू वस्तीतील लहान मुलं, महिला मोठ्या सातूरतेने गोड पदार्थाची वाट पाहत असतात. कधी न मिळणार अन्न थोडंथोडं का होईना खायला मिळाल्याने त्यांना वेगळाच आनंद सर्वांना होत असतो. हे उपक्रम राबविण्यात नौसर्गिक पर्यावरण मानवता विकास संस्थेच्या तेजस्विनी नागोसे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा आणि रत्ना चौधरी नागपूर विभाग सचिव यावेळी उपस्थित होते. News34 follow google news
