News34
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही - दि.१९ मार्च शनिवार ला दुपारच्या सुमारास शहरातून पाथरी गावाकडे जाणाऱ्या मेन रोड मार्गावर शहरातल्या क्रीडा संकुल आयटीआय जवळ भरधाव वेगात जाणाऱ्या दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर धडक झाली.
Two-wheeler collisions
प्रवीण नैताम वय 24 राहणार मुरमाडी ता. सिंदेवाही हा आपले मोटर सायकल वाहन क्रमांक एम एच -३४ बि वाय-०३४६ने सिंदेवाही शहरातून पाथरी गावाकडे काही कामानिमित्त जात असताना व व त्याच मार्गे अजय चौधरी त्याची पत्नी हे तांबेगडी मेंढा वरुण सिंदेवाही शहराकडे आपले मोटर सायकल वाहन क्रमांक एम एच -३४ एस-५२८८ ने येत असता शहराच्या तीन किमी अंतरावर क्रीडासंकुल जवळ दोघा मोटारसायकल स्वारांची एकमेकास मोटारसायकलला धडक झाली. या धडकेत दुखापत होउन तिघेही जखमी अवस्थेत पडले अशी माहिती सिंदेवाही पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस हवालदार ठोंबरे व वाहतुक शिपाई गेडेकर दाखल होत त्यांनी अपघातात जखमी झालेल्या तिघांना ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे पाठवले असून घटनास्थळाचा पंचनामा करून पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे आरोपीवर व निष्काळजीपणे वाहन चालविणे याबाबत कलम -२७९,३३७, सहकलम -१८४ motor vehicle act मोटर वाहन कायद्या नुसार गुन्हा दाखल केला आहे व अपघातात जखमी झालेल्या तिघांपैकी प्रवीण नैताम जखमी ला डॉक्टर ने जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे पाठविले आहे.
पुढील तपास सिंदेवाही पोलीस ठाणेदार घारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.
