News34 Gadchandur
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
स्त्री ही विश्वाची जननी असून तिला तिचे हक्क मिळुन सक्षमीकरण होणे काळाची गरज असल्याचे मत कोरपना नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ.नंदाताई विजय बावणे यांनी व्यक्त केले.ते "जागतिक महिला दिन" प्रसंगी कोरपना नगरपंचायत व Lokmat सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला मेळाव्यात बोलत होते.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या सौ.अल्काताई रणदिवे,प्रा.ज्योती रेगुंडवार,लोकमत सखी मंच तालुका संयोजिका इंदिरा कोल्हे,शहर संयोजिका छाया जेनेकर,पर्यवेक्षिका वाघमारे, नगरपंचायत महिला व बालकल्याण सभापती मनीषा लोडे, उपसभापती आरीफा शेख,नगरसेविका देवीका पंधरे,जोशना खोबरकर,राधीका मडावी,गीता डोहे, आशा झाडे,सविता तुमराम आदींची प्रमुखाने उपस्थिती होती. World woman day celebrate
महिला दिनानिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. News34
यात समयसूचकता स्पर्धेत प्रथम क्रं.शारदा हजारे,द्वितीय क्रं.अर्चना घुमे, तृतीय क्रं.टिना गिरडकर.रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रं.प्रिया उराडे,द्वितीय क्रं.माधुरी टेकाम,तृतीय क्रं.किरण हिरादेवे तसेच संगीत खुर्ची स्पर्धेत प्रथम क्रं. सुहासिनी उमरे, द्वितीय क्रं.किरण हंसकर,तृतीय क्रं.गीता पिंपळशेंडे यांनी पटकावला.संचालन डाखरे, आभार न.पं. उपाध्यक्ष इस्माईल शेख यांनी व्यक्त केले. याप्रसंगी उपस्थीत मान्यवरांनी सुद्धा मार्गदर्शन केले. मोठ्या हर्षोल्हास व उत्साहाने महिला दिन साजरा करण्यात आला मोठ्यासंख्येने महिलांची उपस्थिती होती.