News34 (प्रतिनिधी - गुरू गुरनुले)
मुल - विरई गावातील गरीब सर्वसामान्य गरजू नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे गावात कोणीही रोगी राहू नये या उदात्त हेतूने मुल तालुक्यातील मौजा विरई ग्राम पंचायतिच्या वतीने रविवार दिनांक ६ मार्च २०२२ रोजी गरीब सर्वसामान्य विकासासाठी व सर्व सामान्य नागरिकांसाठी मोफत रोगनिदान व नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. नागरिकांच्या आरोग्यासाठी सदैव झटणारे होतकरु सरपंच श्री.प्रदीप वाढई यांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरासाठो उपसरपंच विभा उराडे, सदस्य किरण ठाकरे, शशिकांत जेंगठे, अनिता वसाके,शांताबाई गेडाम, मिनाक्षी भोयर, छबिलदास गोवर्धन,सचिन कंदीकुरवार उपस्थित होते. आरोग्य शिबिरात महिला पुरुष,लहान मुले,मुली वयोवृद्ध असे मिळून २०० ते ४०० नागरिकांनी आरोग्याची तपासणीचा लाभ घेतला. रूग्णांची तपासणी वैद्यकीय अधिकारी बेंबाळ डॉ. जतीन लेनगुरे, वैद्यकीय अधिकारी राजोली डाँ.दिनेश माशेलकर, डॉ. सरला रंगारी आरोग्य सहायक अजय कुमार बनसोड, जी.एल.वैद्य, CHO कल्याणी पाल, आरोग्य सेविका व्ही.एस.उईके, इ.बी.आंबेकर, के.के.बरसागडे,एम.आर. कोडपत्तीवार, परिचर बावणे, वाहन चालक आर.के.मुळे, asha worker शुभांगी गणवीर, सुरेखा भोयर, यांनी तपासणी साठी सहकार्य केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी के.टी. रामटेके, महेश मोहूर्ले, चपराशी, संदीप ढोले,सदानंद सोनूले गावातील नागरिक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन देवानंद वाढई यांनी केले प्रास्ताविक सरपंच प्रदीप वाढई यांनी केले तर आभार संघपाल उराडे यांनी मानले.