प्रतिनिधी/प्रशांत गेडाम
सिंदेवाही - सोमवार दि.7 मार्चला रात्रीच्या सुमारास सिंदेवाही शहरातील बस स्टॉप च्या मागे राहत असलेल्या तरुण युवकाने गळफास घेऊन आत्महत्या suicide केल्याची घटना सोमवारी रात्रौ ला उघडकीस आली.
मृतक नाव - अक्षत सुभाषचंद्र बिहाणी वय - 22 त्रिवेणी नगर सिंदेवाही असे असून अक्षत बिहानी याला हॉटेलमध्ये जेवण करण्याची सवय होती. अक्षत बिहाणी याने सोमवारी रात्रौ ला आईवडिलांकडे हॉटेलमध्ये जेवण (Meals at the hotel) करण्याकरता पैशाची मागणी केली असता त्याला हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी पैसे न दिल्याने रागाच्या भरात अक्षत ने स्वतःच्या राहत्या घरात जाऊन रूमचे दार आतून बंद करून सिलिंग फॅन ला ओढणी बांधून स्वतःला गळफास घेऊन आत्महत्या केली. News34 सदरची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल होत घटनास्थळाचा पंचनामा करून मृतक अक्षत बिहाणी याचे शवविच्छेदन करता ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे पाठवले असून पोलीस स्टेशन येथे मर्ग क्रमांक- 6/22 नोंद केला आहे. suicide boys
पुढील तपास सिंदेवाही ठाणेदार घारे यांच्या मार्गदर्शनाखाली ASI बळीराम गेडाम हे करीत आहेत.