News34
चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी व दारूबंदी नंतरच्या परिस्थिती मध्ये सध्या मोठं अंतर बघायला मिळत आहे.
दारूबंदी असताना संघटित गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली होती.
दारूबंदी उठल्यानंतर अनेक नवे अवैध धंदे उदयाला आले, मात्र त्या अवैध धंद्याला बंद करणे आजपर्यंत पोलिसांना ही शक्य झाले नाही. Chandrapur police
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी गृहमंत्री, पोलीस महासंचालक यांची भेट घेत चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली गेली असल्याचे निवेदन दिले, त्यांच्या निवेदनाला एक दिवस लोटत नाही तोच विद्यमान पालकमंत्री वडेट्टीवार जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घ्यायला लागतात.
याच कारण एकच ते आहे राजकारण, राजकारणात कुणीही आपल्या वर गेलं तर ते कुणालाही चालत नाही, म्हणून पुढच्या व्यक्तीला तोंडघशी पाडण्याचा हा एक प्रकार आहे.
सध्या चंद्रपुरात ताजा विषय नागरकर यांच्या मारहाणीचा सुरू आहे, मात्र त्यामागील अचूक कारण हे फक्त नागरकर यांनाच ठाऊक, त्यांना ज्याप्रमाणे मारहाण केल्या गेली तो कट कारस्थान रचून केली आहे.Illegal trades
पोलिसांचा तपासाला गती मिळाल्यास या मारहाणीचे नेमके कारण काय असणार ते पुढे येणारचं.
पोलिसांनी जिल्ह्यात अवैध धंद्याविरोधात आपला दरारा दाखवावा असे निर्देश पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिले आहे.
मात्र जिल्ह्यात सुरू असलेले अवैध धंदे राजकीय पाठबळाशिवाय शक्यचं नाही.
अवैध कोळसा वाहतूक, कोल डेपो, जुगार, सट्टा पट्टी, सुगंधित तंबाखू, वाळू तस्करी sand mafia, गांजा तस्करीचे प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणात चंद्रपूर जिल्ह्यात वाढले आहे.
मागील वर्षी सुगंधित तंबाखू प्रकरणी कांग्रेस नेत्यांची audio clip virul झाली होती, त्यावर काहीच कारवाई झाली नाही, या महिन्यात वाळू तस्करी करताना मजुराचा मृत्यू झाला ते प्रकरण कारवाई शिवाय शांत झाले.
सुगंधित तंबाखू (Aromatic tobacco) चा व्यापाराने जिल्ह्यात मोठं जाळ तयार केले आहे, कारवाई करून सुद्धा हे धंदे का बंद होत नाही आहे? कारण यामागे मोठं राजकीय पाठबळ आहे.
सदर व्यापारी राजकीय पक्षाच्या नेत्यांशी जुळवून घेत कारवाई टाळत असतात.
अवैध कोळसा वाहतूक, Coal डेपो यांचे चालक, मालक यांचे घनिष्ठ संबंध व बैठक राजकीय नेत्यांशी आहे, तर कारवाई होणार कशी?
राजकीय नेत्यांचे Coal transportation चे मोठे काम सुरू आहे, अवैध कोलडेपो सुरू असून हे जनप्रतिनिधींना ठाऊक असून सुद्धा सुरुच आहे, राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने हे सर्व सुरळीत सुरू आहे.
वाळू तस्करी करणारे राजकीय नेत्यांचे नातेवाईक, कुणी मामा तर कुणी भाचे मग महसूल प्रशासन कारवाई करणार तरी कुणावर?
रेतिघाटाचे लिलाव सध्या झाले नसून मोठ्या प्रमाणात JCB लावून रेतीचा उपसा सुरू आहे, मात्र उपसा करणारे कुणी तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष तर कुणी विभागाध्यक्ष, नाहीतर नातेवाईक.
सट्टा व्यापाराने आता आपलं स्वरूप पूर्णपणे बदलले आहे, आधी हे काम लपुन सुरू असायचे मात्र आता खुलेआम सुरू झाले आहे.
असे अनेक अवैध धंदे जिल्ह्यात सुरू आहे मात्र त्यावर वचक पूर्णपणे लागणे हे सध्यातरी शक्य नाहीच.
जोपर्यंत राजकीय हस्तक्षेप सुरू असेल तो पर्यंत जिल्ह्यात अवैध धंदे असेच सुरू राहणार.
विद्यमान की माजी पालकमंत्री यांनी कितीही निवेदने दिली तरीही तो राजकारणाचा एक भाग म्हणून बघितल्या जाणार, कारवाई मात्र राजकीय हस्तक्षेपाने होणार नाही. Political support
जिल्ह्यात गुन्हेगारी सपाट्याने वाढत आहे, कारण Online ची आभासी दुनिया याला पूर्णपणे कारणीभूत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात घडलेल्या अनेक गुन्ह्यात अल्पवयीन बालकांचा सहभाग वाढणे ही चिंतेची बाब आहे.
यावर पोलीस प्रशासनाने न डगमगता खाकी वर्दीचा जोर दाखवीत गुन्हेगारांवर आपली वचक निर्माण करायला हवी.
