News34 Gadchandur
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथे 6 मार्च रोजी विदर्भ पद्मशाली समाज संघटनेची सभा आयोजित करण्यात आली.यात तालुक्याची नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली.
सतीश बेतावार तालुकाध्यक्ष तर सचिव संजय कोंडबतुनवार,उपाध्यक्ष प्रविण बोमावार, सहसचिव प्रकाश तुमेवार,कोषाध्यक्ष राजेश परसवार,संघटन सचिव संतोष बोमावार तसेच प्रा. विजय आकनुरवार, प्रा.अतुल अल्लेवार,नरसिंग येमुलवार, संजय कोकुलवार, संपत सुंके,विशाल रेबावार, पुरूषोत्तम पुठ्ठावार, मारूती येमुलवार यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
सदर सभेत समाज कार्य व समाज संघटनेबाबत सविस्तर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांंसह राजेश परसावार, पुरषोतम पुठ्ठावार या सेवानिवृत्त समाज बांधवांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.सभेला तालुक्यातील समाज बांधवांची उपस्थिती होती.
