चंद्रपूर - लग्न व्हायच्या आधी मुलींना Miss World, Miss India अश्या सौंदर्य स्पर्धेत भाग घेत स्पर्धा जिंकणं हे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या अनेक अडचणी बघता कुणी स्पर्धेत भाग घेण्याचा विचार करीत नाही मात्र मूळ चंद्रपूरच्या व सध्या सोलापुरात राहणाऱ्या विवाहित महिलेने मिसेज इंडिया स्पर्धेत चंद्रपूर व सोलापूरचा डंका वाजविला आहे.
विवाहित म्हटलं की महिलांना घरकाम व मुलंबाळं सांभाळायचं इतकेच आयुष्य महिलेच्या नशिबी असत मात्र या आयुष्याला हाताशी घेत थेट मिसेज इंडिया स्पर्धेत भाग घेत पुरस्कार ही पटकाविणारी चंद्रपुरातील मुलगी शिल्पा आडम-चिंतलवार यांनी करून दाखविले.
सर्वसाधारण परिवारातून थेट मिसेस इंडिया स्पर्धेत पुरस्कार पटकविण्याचा अनुभव स्वतः चंद्रपूरची कन्या शिल्पा आडम-चिंतलवार यांनी श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित मिट द प्रेस च्या माध्यमातून कथन केला.
वडील अरुण चिंतलवार शासकीय विभागात सर्व्हेअर म्हणून कार्यरत होते, शिक्षणाची सुरुवात लोकमान्य टिळक कन्या विद्यालय चंद्रपूर पुढील शिक्षण FES गर्ल्स कॉलेज मधून पूर्ण केल्यावर फॅशन डिजाइनिंग चे शिक्षण पूर्ण झाल्यावर आई-वडिलांनी शिल्पाचं लग्न सोलापूर येथील आडम कुटुंबियांत लावून दिले.
मध्यंतरी देशात कोरोना महामारीच्या सावटात 2 वर्षे लॉक डाउन मध्ये गेले.
मात्र सदर महामारीचा शिल्पा ने चांगला उपयोग करीत स्वतःच Youtube चॅनेल सुरू करीत नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर मैत्रिणीने मिसेज इंडिया स्पर्धेत भाग घेण्यासाठी सांगत अर्ज ही भरला.
शिल्पा यांना सदर स्पर्धेत भाग घेण्यासाठी आई-वडील व सासरच्या मंडळींनी पाठिंबा दिला.
देशातील 2500 स्पर्धकातून 55 स्पर्धकात स्थान पटकावीत नंतर 15 मध्ये स्थान पक्क केल्यावर ही स्पर्धा जिंकत त्यांनी चंद्रपूर - सोलापूर या जिल्ह्याचं नाव देशाच्या पटलावर पोहचविले.
आता शिल्पा आडम यांचं लक्ष्य mrs world 2022 साठी भारताचं प्रतिनिधित्व करणार असून लवकरचं अमेरिकेतील मियामी या देशात स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
सध्या शिल्पा आडम या सामाजिक कार्यात सहभागी झाले आहे.
शिल्पा आडम यांना मॉडेल नाही तर महिलांचं Roll Model बनायचं आहे अशी त्यांची इच्छा आहे, आता पुढचं लक्ष्य मिसेज वर्ल्ड 2022 स्पर्धा जिंकत देशाचं नाव उंचविण्याचे मनापासून त्यांची इच्छा आहे.