News34 chandrapur
चंद्रपुर : अनेक वर्षांपासुन ओबीसींच्या मागण्या व समस्या प्रलंबित आहेत. केंद्र सरकार सातत्याने ओबीसी समाजावर अन्याय करीत आहे. ओबीसींचे आरक्षण कमी करण्याचा घाट घालत आहे. ओबीसींची जातनिहाय जनगणना नाकारुन ओबीसींना संविधानिक हक्क व अधिकारांपासुन वंचित ठेवत आहे. म्हणुन सर्व राजकिय पक्षांनी ओबिसी आरक्षण लागु व्हावे, करीता सर्वानुमते आवाज उठविला पाहिजे, political reservation maharashtra असे ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी म्हटले.
सदर चक्का जाम आंदोलन आज (दि. ७) ला दुपारी १२.०० वाजता स्थानिक वरोरा नाका चौक येथे घोषणांच्या गर्जना करीत हजारो ओबीसींच्या उपस्थितीत करण्यात आले. Obc protests
ओबीसी समाजाची जातनिहाय्य जनगणना करण्यात यावी. स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसीचे राजकीय आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका घेण्यात येवु नये. ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्यात यावे. ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के scholarship देण्यात यावी तसेच मागील दोन वर्षापासुन मॅट्रीकपुर्व स्कारलशिप देण्यात आलेली नाही ती त्वरीत विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी. राज्य सरकारने त्वरीत वर्ग ३ व ४ पदाची पदभरती लवकरात लवकर घेण्यात यावी. बिगर आदिवासी वनपट्ट्यासाठी असलेली तीन पिढ्याची अट त्वरीत रद्द करण्यात यावी. केंद्रात ओबीसीचे स्वतंत्र मंत्रालय सुरू करण्यात यावे. एस.सी. व एस. टी. शेतकऱ्याप्रमाणे ओबीसी शेतकऱ्यांना शासकीय योजना त्वरीत सुरू करण्यात याव्या. केंद्र सरकारने क्रिमीलेअरची मर्यादा वाढविण्यात यावी, इत्यादी ओबीसी समाजाच्या मागण्या घेवुन आंदोलन करण्यात येत आहे. Obc reservation
आंदोलनानंतर स्थानिक प्रशासनामार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, पंचायतराज मंत्री, अर्थमंत्री, विरोधी पक्ष नेते आदींना निवेदन देण्यात आले. Obc leader
ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर, दिनेश चोखारे, नितिन कुकडे, अशोक पोफळे, रविकांत वरारकर, राजेंद्र खाडे, आशीष महातळे, संजय सपाटे, विनायक बोढाले, जोत्सना लालसरे, रवि देवाळकर, रविंद्र टोंगे, अनिल शिंदे, सुर्यकांत खनके, रवि जोगी, मंजुळा डुडुरे, लिलाधर खंगार, दिगांबर चौधरी, श्रीपद मटाले, गणेश आवारी, पारस पिंपळकर, विजय मालेकर, रामराव हरडे, अंकुश कौरासे, पारखी, राजकुमार नागापुरे, रोशन पचारे, प्रेमानंद जोगी, नितिन खरवडे, राकेश खुसपुरे, विठोबा पोले, आनंद चलाख, राकेश पिंपळकर, सिताराम बावनकर, शिवशंकर कोरे, दौलतराव सोनारकर, योगेश पेंटेवार, बंडू लांडे, भास्कर जीवतोडे, दिपक मेंढे, कमलाकर धानोरकर, दिलीप हेपट, प्रविण जोगी, तथा जिल्हाभरातून हजारो ओबीसी सहभागी झाले होते.

