चंद्रपूर - चंद्रपूर मनपाच्याया मनमानी कारभाराविरोधात अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षातर्फे "चंद्रपूर महानगरपालिकेचा उलटा चष्मा" लक्षवेधी आंदोलन 9 मार्चला डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ होणार आहे.
मनपातर्फे वाढविण्यात आलेला गृहकरात करण्यात आलेली वाढ, अनियमित पाणीपुरवठा नियमित करावा, अमृत योजनेमुळे शहरातील झालेल्या रस्त्यांची दुर्गती तात्काळ दुरुस्त करण्यात यावी, आजही नाल्यांचे बांधकाम न झाल्यामुळे नागरिकांना सांडपाण्याचा त्रास, घंटागाडी कामगारांना इलेक्ट्रिक घंटा गाडी देण्यात यावी, शहरातील संडे मार्केटला स्थायी जागा देण्यात यावी या मागणीसाठी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष मनपा विरोधात लक्षवेधी आंदोलन करणार आहे.
अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण खोब्रागडे, प्रेमदास बोरकर, निर्मला नगराळे व मृणाल कांबळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.