चंद्रपूर - होळी आणि धूलिवंदन यांसाठी राज्यशासनाने नियमावली घोषित केली आहे. यात पुढील नियम अंतर्भूत आहेत. यामध्ये रात्री १० वाजण्यापूर्वी होळी करावी, या वेळी 'डीजे' लावण्यास (No Dj) बंदी असणार आहे. (Holi festival)
पुन्हा एकदा लोकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. ही गर्दी कोरोना वाढीला कारणीभूत ठरू नये म्हणून राज्य सरकारने हे सण साजरे करण्यासाठी नियमावली जारी केली आहे. Holika dahan 2022
होळी तसेच धुलीवंदन साजरा करण्यासाठीची नियमावली राज्याच्या गृहविभागाने जारी केली आहे. या नियमावलीनुसार रात्री १० वाजेच्या आत होळी पेटवणे बंधनकारक करण्यात आले आहे. Holi in 2022
होळी तसेच धुलीवंदनासाठी गृहखात्याची नियमावली
- होळी रात्री १० वाजेच्या आत पेटवणे बंधनकारक आहे.
- होळीदरम्यान डीजे लावण्यावर कायदेशीर बंदी आहे.
- दहावी तसेच बारावी वर्गाच्या परीक्षा सुरु असल्यामुळे लाऊडस्पीकरचा आवाज मोठा केल्यास कारवाई होईल.
- होळी साजरी करताना मद्यपान तसेच बिभत्स वर्तन केल्यास कारवाई होईल.
- होळी खेळताना महिला तसेच मुलींची खबरदारी घेण्याचे आवाहन.
- कोणत्याही जातीधर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नये.
- धुलीवंदनाच्या दिवशी जबरदस्तीने रंग लावू नये, पाण्याचे फुगे फेकू नयेत.
- दरम्यान, गृह विभागाने जारी केलेली नियमावली तसेच कोरोना प्रतिबंधक नियमांचेही पालन करावे, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.
- Government guidelines