News34
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील "कुसल शरीफ़" येथे "हजरत दुल्हेशाह बाबा रहे.अलैह" यांचा तीन दिवसीय उर्स उत्सव 16 मार्च रोजी मोठ्या हर्षोल्हासात संपन्न झाला.दरवर्षी प्रमाणे यंदाही या उर्समध्ये एकतेचे अदभुत दर्शन घडले.
Urs festival
सर्वधर्म समभावचे प्रतिक असलेले बाबाच्या दर्शनासाठी हजारो भक्त भाविकांनी गर्दी केली होती. निसर्गरम्य अशा वातावरणात पुरातन काळापासून येथे बाबांची मज़ार(समाधी)असून दरवर्षी याठिकाणी पारंपारिक पद्धतीने उर्स उत्सव व धार्मिक कार्यक्रम पार पाडले जातात.एकतेचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या या तिर्थस्थळावर चंद्रपूर, जिल्ह्यासह नागपूर, वर्धा, यवतमाळ,नांदेड व तेलंगणा राज्यातून हजारो सर्व धर्मिक बांधव मोठ्या श्रद्धेने याठिकाणी येवून दर्शन घेतात. याच पार्श्वभूमीवर इतर ठिकाणांसह गडचांदूर येथील नुरानी कमिटीच्या वतीने जुलूसचे आयोजन करण्यात आले होते.ढोल ताशांच्या गजरात व अश्वांच्या मनमोहक नृत्याने शहरातील मुख्य मार्गाने भ्रमन करीत जुलूस कूसल शरीफकडे रवाना झाला. त्याठिकाणी बाबांच्या दर्ग्यावर रितीरिवाजाने पुजाअर्चना करण्यात आली. बाबांच्या दर्ग्यावर अर्पण करण्यासाठी पुष्प चादर व रंगबिरंगी आकर्षक रोषणाईने सजवलेला अश्वरथ प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा ठरला. मोठ्यासंख्येने सर्व धर्मिय शहरवासीयांनी संदलचा मनसोक्त आनंद घेतला. पोलिस बंदोबस्त चोख होता.