चंद्रपूर - Home Loan साठी बनावट Income tax return बनवीत स्टेट बँकेच्या एजंट मार्फत अर्ज केला, मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पडताळणी न केल्याने चंद्रपुरातील State Bank Of India ला तब्बल 14 कोटी 26 लाख 61 हजार 700 रुपयांचा चुना लावल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
स्टेट बँकेचे Regional Manager संजोग अरुणकुमार भागवतकर यांनी 8 मार्च 2020 ला रामनगर पोलीस स्टेशन चंद्रपूर मध्ये फसवणुकीची लेखी तक्रार सादर केली होती. Economic Crimes Branch
भागवतकर यांच्या तक्रारीची दखल घेत आर्थिक गुन्हे शाखेने कलम ४२०,४०६,४० ९, ४१७,४६५,४६६, ४६७, ४६८, ४७१,१२० ( ब ) भां.द. वी चा गुन्हा दाखल केला.
फसवणूक प्रकरणात 44 गृह कर्जाचे अर्ज बँकेकडे आले होते यामध्ये बहुतांश अर्ज धारकांनी बनावट आयकर रिटर्न दाखल्याचे प्रमाणपत्र एजंट मार्फत सादर केले होते, मात्र नियमानुसार सदर अर्जाची पडताळणी झाली नव्हती व मूल्यांकणापेक्षा जास्तीच्या रकमेच्या कर्जाचे वाटप करण्यात आले होते.
कर्ज वाटपानंतरच्या तपासणी मध्ये बॅकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बँकेची एकुण १४ , २६ , ६१,७०० / - रु चे फसवणुक झाल्याची बाब लक्षात आल्याने त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणात गुन्हा निष्पन्न झाल्याने ११ कर्जधारक, एजंट ०१ व बॅकेचे ०३ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे. सदर प्रकरणी पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक दिपक मस्के ( आर्थिक गुन्हे शाखा ) अधिक तपास करत आहेत.
