News34 Chandrapur
चंद्रपूर - मार्च महिना सुरु होताच चंद्रपूरातील उन्ह आपली जाणीव करून देते. त्यामुळे स्टोअर रूममधून Cooler बाहेर काढण्यात येत आहेत. परंतु सावधान कारण कुलरच्या वापरासोबतच कुलरची सुरक्षित हाताळणी व वापर अपघात टाळण्यास गरजेचे आहे.
उन्हाळयात शॉक लागून जीवहानी अथवा आग लागल्याने वित्तहानी संभवते. अपघात टाळण्यासाठी कुलरचा वापर नेहमी थ्री-पीन प्लगवरच करावा. घरात अर्थिंग लिकेज सर्किट बेस बसवून घ्यावे, बाजारात हे उपकरण सहज उपलब्ध असून विजेचा धोका संपताच विजेचा पुरवठा बंद होतो. घरातील अर्थिंग योग्य असल्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. Earthing व्यवस्थित असेल तर बराच धोका कमी होतो तसेच विजेचा वापर योग्यप्रकारे होतो. Summer season
कुलरच्या लोखंडी बाहय भागात वीज पुरवठा येऊ नये, यासाठी कुलरचा थेट जमिनीसोबत संपर्क येईल अशी व्यवस्था करावी. पाणी भरतांना कुलरचा वीज पुरवठा बंद ठेवावा. कुलरमधील पाणी जमिनीवर पडणार नाही, याची काळजी घ्यावी. ओल्या हाताने कुलरला स्पर्ष करू नये. ओल्या हाताने किंवा ओल्या जमिनीवर टिल्लू पंप सुरू करू नये, पंपातून पाणी येत नसेल तर पंपाचा Power supply आधी बंद करावा. त्यानंतर प्लग काढल्यानंतर व पंपाला हात लावला. पंप पाण्यात बुडला नसलयाची खात्री करून घ्यावी. बरेचदा पाण्याची पातळी खोल गेल्याने पंप सुरू करूनही पाणी खेचले जात नाही. तो पंप Air lock होतो. अशा वेळी प्रायमिंग करणे आवश्यक असते. बरेचदा अज्ञानामुळे चालू पंपाचे प्रायमिंग केले जाते. अशावेळी विजेचा शॉक लागण्याची शक्यता असते. त्यामुळे चालु पंपाचे प्रायमिंग करणे टाळावे, अशाप्रकारे खबरदारी घेणे गरजेचे आहे.
