चंद्रपूर - देशातील अग्रगण्य बँक म्हणून ओळखल्या जाणारी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चंद्रपूर शाखेला कोट्यवधी रुपयांचा चुना काही प्रतिष्ठित व नावाजलेल्या व्यक्तींनी लावल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे,huge frauds सदरचा महाघोटाळा उघडकीस आणण्यासाठी राष्ट्रवादी कांग्रेसचे शहराध्यक्ष राजीव कक्कड यांनी तक्रार केली होती. कक्कड यांच्या समयसूचकते मुळे कोट्यवधी रुपयांचा अपहार उघडकीस आला.
Sbi india
4 जानेवारी 2020 ला देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्याकडे कक्कड यांनी तक्रार दिली होती.
जिल्ह्यातील बिल्डरसोबत बँक अधिकाऱ्यांनी संगनमत करून व कर्जाच्या अर्जाची पडताळणी न करता Home Loan पास केले.
इतकेच नव्हे तर बिल्डरांनी ड्युप्लेक्स, फ्लॅट विकण्यासाठी मजुरांच्या नावे 30 ते 40 लाखांचे कर्ज बँकेकडून मंजूर करवून घेतले, document fake ते सुद्धा बनावट itr return आयकर रिटर्न बँकेकडे सादर केले होते. Sbi Bank
आर्थिक परिस्थितीनुसार 10 ते 15 लाखांचे कर्ज बँकेने द्यायला हवे होते मात्र तसे न करता सरळ 30 ते 40 लाखांचे कर्ज दिले. बँक एजंट व अधिकाऱ्यांच्या या कारनाम्याने बँकेला मोठा आर्थिक फटका बसला.
राष्ट्रवादी कांग्रेसचे शहराध्यक्ष राजीव कक्कड, युवक कांग्रेस जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर व विधानसभा अध्यक्ष नितीन काळे यांनी प्रकरणाचा सतत पाठपुरावा सुरू ठेवत बँकेच्या विभागीय अधिकाऱ्यांना चौकशी करण्यास भाग पाडले. Land sale scams
सध्या 14 कोटी 26 लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आला पण हा घोटाळा 70 ते 80 कोटी रुपयांच्या घरात असल्याचा दावा राजीव कक्कड यांनी केला आहे. leader of nationalist congress party
या प्रकरणात 1 एजंट, 3 बँक अधिकारी व 11 कर्ज धारक ग्राहकांना अटक करण्यात आली आहे, मात्र यामध्ये अजूनही मोठे मासे पोलीस अटकेपासून दूर आहे.
या गंभीर घोटाळ्याची सरकारने दखल घेत सीबीआय चौकशी लावावी अशी मागणीही कक्कड यांनी केली आहे.
