News34
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर 10 मार्च रोजी गडचांदूर येथे भारतीय जनता पार्टी महिला आघाडीतर्फे महिला पोलिस व वयोवृद्ध महिलांचा सत्कार करण्यात आला.यानिमित्ताने "E-labor card" चे वितरण करण्यात आले.
भाजप जिल्हा महामंत्री सौ.विजयालक्ष्मी डोहे यांच्या प्रमुख उपस्थितीत व श्रीमती शांताबाई मोतेवाड यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम पार पडला. Bjp woman
यावेळी जिल्हा सचिव सौ.रंजना मडावी, निता बोबडे, सौ. अपर्णा उपलेंचीवर, सौ.दीपांजली मंथनवार, महिला पोलिस करमनकर, बालिका मॅडम, सौ.कुचनकर इत्यादींची उपस्थिती होती. संचालन सौ.जयश्री दुबे, प्रास्ताविक सौ.अपर्णा उपलेंचीवर तर आभार सौ.पायल येलमुले यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात मोठ्यासंख्येने महिलांची उपस्थिती होती.
