News34
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
काँग्रेसच्या डिजिटल सदस्य नोंदणीसाठी नियुक्त मुख्य नोंदणी कर्त्यांची आढावा बैठक क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या निर्देशानुसार तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष विठ्ठलराव थिपे यांच्या अध्यक्षतेखाली कोरपना येथे संपन्न झाली. Digital congress काँग्रेस पक्षाने प्रथमच डिजिटल पद्धतीने सदस्य नोंदणी सुरू केली असून संपूर्ण पारदर्शक पद्धतीने नवीन नोंदणी केली जाणार आहे.
Membership registration सदस्य नोंदणी मोहिमेत मुख्य नोंदणी कर्त्यांनी आपल्याला क्षेत्रातील नोंदणी कर्त्यांची निवड करून कोरपना तालुका हा जिल्ह्यात सर्वाधिक सदस्य नोंदणी करणारा तालुका म्हणून समोर येईल यासाठी सर्वांनी संपूर्ण प्रयत्न करण्याचे आवाहन माजी जि.प. सदस्य तथा तालुका सदस्य नोंदणी समन्वयक उत्तमराव पेचे यांनी केले.

जिल्ह्यातील सर्व नगरपंचायत क्षेत्रातून कोरपना नगरपंचायत मध्ये सर्वाधिक सदस्य नोंदणी केली जाईल,असे आश्वासन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजय बावणे यांनी उपस्थितांना दिले.तर गडचांदूर न.प.गटनेता विक्रम येरणे यांनी संपूर्ण सदस्य नोंदणी प्रक्रिया समजावून सांगितली.
सदर कार्यक्रमात पंचायत समितीचे उपसभापती संभाजी कोवे,जेष्ठ नेते सुरेश पा.मालेकर,मनोहर चन्ने, गणेश गोडे, शैलेश लोखंडे,उमेश राजूरकर, न.पं. उपाध्यक्ष इस्माईल शेख,नगरसेवक नितीन बावणे, निसार शेख,रोशन आस्वले,विलास मडावी, प्रशांत लोंढे, सचिन मालेकर,स्वप्नील माणूसमारे, सुनील कोहचाडे,रोशन मरापे,अनील गोंडे इतरांची उपस्थिती होती. संचालन गणेश गोडे तर आभार निसार शेख यांनी व्यक्त केले.