News34
चंद्रपूर - महानगरात मागील काही महिन्यात गुन्हेगारीने चांगलेच डोके वर काढले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली. शहरातील वाढत्या गुन्हेगारीवरून पालकमंत्र्यांनी पोलीस यंत्रणेची चांगलीच कानउघाडणी केली होती. दरम्यान, गुन्हेगारांमुळे शहरातील शांतता आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये तसेच होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अट्टल गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली.
शहरातील २३ गुन्हेगारांना हद्दपार केले जाणार असून, आतापर्यंत ११ गुन्हेगारांच्या (Deportation) हद्दपारीचे आदेश निघाल्याची माहिती आहे.
मागील काही महिन्यांपासून चंद्रपूर महानगरात गुन्हेगारीच्या अनेक घटना घडल्या आहेत. खून, प्राणघातक हल्ला, Chain snatching, धमकावणे असे प्रकार घडत आहेत. काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस नगरसेवक नंदू नागरकर यांच्यावर काही युवकांनी प्राणघातक हल्ला केला होता. तर Raghuvanshi complex परिसरात काही महिन्यांपूर्वी गोळीबार केल्याची घटना घडली होती. शिवाय शहात खुनाच्याही अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. नागरकर हल्ला प्रकरणानंतर पालकमंत्री वडेट्टीवार यांनी शहरातील गुन्हेगारीचे प्रकरण गांभीर्याने घेत पोलीस विभागाची तातडीची बैठक घेतली होती. Stubborn criminals
यावेळी महानगरातील वाढत्या गुन्हेगारीवरून त्यांनी पोलीस यंत्रणेवर चांगलेच ताशेरे ओढले होते. Law and order
यानंतर महानगरातील अट्टल गुन्हेगारांवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. दोन दिवसावर आलेला होळी अणि धुलीवंदनाचा सण, पुढील काही महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहरातील पोलीस ठाणे रेकार्डवर असलेल्या अट्टल गुन्हेगरांवर जिल्ह्यातून हद्दपार केले जाणार आहे. दरम्यान, गुन्हेगारांच्या हद्दपारीसाठी रामनगर पोलिसांनी १६ गुन्हेगारांचे प्रस्ताव तयार केले आहेत. यापैकी ११ प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी