news34
चंद्रपूर - आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून 19 मार्च ला आयोजित आमदार चषक विदर्भस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेची (bodybuilding competition)यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जय्यत तयारी सुरु असून शहरात ठिकठिकाणी होर्डिंग्स आणि स्वागत गेट लावण्यात आले आहे. जग प्रसिध्द बॉडी बिल्डर Suhas Khamkar हे या स्पर्धेचे विशेष आकर्षण असणार आहे. Fitness
Follow on News34 Google News19 मार्च ला चंद्रपूरातील महानगर पालिकेच्या पठांगणावर आमदार चषक विदर्भस्तरीय बॉडी बिल्डिंग अजिक्यपद स्पर्धा 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जवळपास 2 लक्ष 46 हजार रुपयांचे बक्षिसे वितरित केली जाणार आहे. या स्पर्धेत विदर्भातील नामांकित बॉडी बिल्डर सहभागी होणार आहे. यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार हे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून तर जग प्रसिध्दी बॉडी बिल्डर सुहास खामकर (professional bodybuilder) india हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. 2022 ला झालेल्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेत ज्युनिअर महाराष्ट्र श्री ठरलेले पंढरपूरचे विशाल सुरवसे हे या स्पर्धेत पोझींग देण्याकरिता उपस्थित राहणार आहे. सध्या या स्पर्धेची जय्यत तयारी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने केल्या जात आहे. या करिता शहरात ठिकठिकाणी होर्डींग्स लावण्यात आली आहे. तसेच शहराच्या मुख्य मार्गाने स्वागत गेट लावण्यात आली आहे. चंद्रपूरातील जवळपास सर्व जिम संचालकांनी या स्पर्धेला सहकार्य करत स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सक्रिय सहभाग घेतला आहे. गांधी चौकातील महानगरपालिकेच्या पठांगणावर सदर स्पर्धेसाठी भव्य स्टेज उभारले जात आहे. सदर स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यंग चांदा ब्र्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे. Champion of Champion