चंद्रपूर - 16 मार्चला शहराच्या बाहेर चोराला येथील असलेले खुले क्षितिज लेआऊट येथे 20 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
आपलं ब्रेकअप होत आहे म्हणून मला एकदा शेवटची भेट घ्यायची आहे असे पठाणपुरा येथील 22 वर्षीय अभिषेक देशभ्रतार या युवकाने तुकूम येथे राहणाऱ्या 20 वर्षीय युवतीला बोलावले.
शेवटची भेट म्हणून युवती अभिषेक ला भेटायला गेली, मात्र अभिषेकने तिला शहराबाहेरील असलेले क्षितीज Lay-out येथे घेऊन गेला, त्याठिकाणी झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणात होती.
दुपारचे 4 नंतर अभिषेकने युवतीच्या मैत्रिणीला कॉल करीत त्यास युवतीचा चारचाकी वाहनांच्या धडकेत मृत्यू झाला असल्याची माहिती दिली.
मृतक मुलीच्या मैत्रीण व मित्रांनी तात्काळ घटनास्थळ गाठले असता त्या ठिकाणी चारचाकी वाहन येणे शक्य नसल्याचे म्हटले. Murder or rape?
अभिषेकने त्या युवतीसोबत बरे वाईट केल्याचा संशय मृतक मुलीच्या मित्रांनी व्यक्त करीत सरळ शहर पोलीस स्टेशन गाठले मात्र घटनास्थळ पडोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याने तात्काळ पडोली पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराला याबाबत माहिती दिली.
पडोली पोलिसांनी घटनेची माहिती घेत तपास सुरू केला, मृतक मुलीच्या खाजगी पार्ट वर रक्तस्त्राव व तिचा पाय मोडलेल्या अवस्थेत असल्याची माहिती आहे. Mystery
घटनास्थळी चादर, ब्लॅंकेट, Condom चे पॉकेट अश्या आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्याने अभिषेक घटनेचा बनाव तर करीत नाही ना अशी दाट शंका निर्माण झाली आहे.
मृतक मुलीचे जो पर्यंत post mortem होत नाही तोपर्यंत नेमकी घटना काय घडली असेल? यावर पोलिसही माहिती देऊ शकत नाही.
2 दिवसांपूर्वी पत्नीने अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीला प्रियकराच्या मदतीने यमसदनी पाठविले, त्यांनी हत्येला अपघाताचा बनाव दिला होता याप्रकरणात असाच बनाव तर नाही याचा तपास पोलीस करीत आहे. Assassination plot
शहराबाहेरील असणाऱ्या लेआऊट हे प्रेमी युगलांचा अड्डा बनला आहे, काही वर्षांपूर्वी अशीच एक घटना दाताला परिसरात घडली होती.