चंद्रपूर - 26 मार्चला शहरातील मध्यभागी असलेल्या आझाद बगीचा उदघाटन कार्यक्रम राजकीय दंगलीने गाजला.
आधी निमंत्रण पत्रिकेत जनप्रतिनिधींना स्थान न दिल्याने अनेक राजकीय पक्ष नाराज झाले होते.
कांग्रेस महानगर अध्यक्ष रामू तिवारी यांनी निमंत्रण पत्रिकेत जनप्रतिनिधींचे नाव टाका अन्यथा कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा दिला.
उदघाटन कार्यक्रमात वाद उदभवू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चौफेर बंदोबस्त लावला. Azad garden inauguration
मात्र कार्यक्रमस्थळी उदघाटन समारंभात चांगलाच गोंधळ बघायला मिळाला.
स्थानिक आमदार किशोर जोरगेवार येण्याआधी आमदार मुनगंटीवार व खासदार धानोरकर यांनी उदघाटन कार्यक्रम उरकून टाकला. Political riots
या प्रकाराने आमदार जोरगेवार चांगलेच संतापले, मात्र महापौर व स्थायी समिती अध्यक्षांच्या मध्यस्तीने आमदार जोरगेवार कार्यक्रमात दाखल झाले.
बगीच्याची पाहणी केल्यावर कार्यक्रमस्थळी असलेल्या मंचावर आमदार जोरगेवार यांच्या खुर्चीसमोरील नावही फाडून टाकण्यात आले.
गोंधळ बघून मंचावर खासदार धानोरकरांनी जाणे टाळले, कांग्रेस कार्यकर्त्यांनी राजशिष्टाचार चा भंग झाल्याने कार्यक्रम होऊ न देण्याचा इशारा दिला होता मात्र पत्रिकेत खासदार व आमदारांचे नाव आल्यावरही बाळू धानोरकर यांनी मंचावर जाणे चं टाळले.
या संपूर्ण गोंधळाचे खापर मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्यावर फुटणार आहे.
ज्याने आग लावली त्याचा आम्ही नक्कीच हिशोब करू असा इशारा आमदार मुनगंटीवार यांनी दिला.
सदर गोंधळ हा लोकशाहीला घातक आहे, जे व्हायला नको होते याचा मी पूर्णपणे निषेध करतो अशी प्रतिक्रिया आमदार जोरगेवार यांनी दिली.
कधी समोर न येणारे चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणी आझाद बगीच्याच्या उदघाटन प्रसंगी समोर आले.
यानिमित्ताने का होईना नागरिकांना जनप्रतिनिधीं यांची राजकीय दंगल बघायला मिळाली.
